Homeताज्या बातम्यानाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 236 कोटींच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्र्यांची मंजुरी!

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 236 कोटींच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्र्यांची मंजुरी!

सन 2026-27 च्या सुमारे 236.07 कोटी रुपयांच्या अंदाजित अर्थसंकल्पास बैठकीत मान्यता देण्यात आली..

पोलीस वार्ता,मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दुसरी वार्षिक बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झाली. सन 2026-27 च्या सुमारे 236.07 कोटी रुपयांच्या अंदाजित अर्थसंकल्पास बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच प्रस्तावित नाशिक रिंगरोड (परिक्रमा मार्ग) च्या लगतच्या दोन्ही बाजूस टप्प्याटप्प्याने नगर रचना योजनेच्या माध्यमातून बाह्य वळण रस्ता प्रभाव क्षेत्र म्हणून विकसित करण्यासही यावेळी मान्यता मिळाली.
तसेच सन 2025-26 च्या सुमारे 454.5 कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पासही यावेळी मान्यता देण्यात आली. एनएमआरडीएच्या कार्यालयासाठी स्वतःची इमारत खरेदी करण्यासह नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केलेल्या भूखंड विल्हेवाट नियमावली व जाहिरात फलक धोरणास मंजुरी देण्यात आली. तसेच शासकीय जमिनींच्या व्यवस्थापनासाठी सल्लागार संस्था नेमणे, तसेच विकास योजनांअंतर्गत जमीन वापर नकाशा तयार करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी अदा करण्यास मंजुरी देण्यात आली.
नाशिक महानगर प्रदेशाच्या प्रभावी नियोजन व विकास मार्गदर्शनासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स इन अर्बन प्लॅनिंग अँड डिझाईन तसेच इतर नगर रचना क्षेत्रातील शासकीय मान्यता प्राप्त संस्थांना ज्ञान भागीदार म्हणून नियुक्ती करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजुरी दिली.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किशोर दराडे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, एनएमआरडीएचे महानगर आयुक्त जलज शर्मा (ऑनलाईन), अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब पारधे आदी उपस्थित होते. शर्मा यांनी अर्थसंकल्प सादर केला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पोलीस मित्र संघटनेच्या सदस्यांना भरतीत प्राधान्य देण्याची मागणी

0
सातारा : पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली (भारत) या संघटनेच्या सदस्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार होमगार्ड तसेच पोलीस भरतीत प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात...

बाल सुधार गृह से तीन बच्चे फरार

0
उज्जैन नागझिरी बाल सुधार गृह से तीन बच्चे फरार उज्जैन नागझिरी बाल सुधार ग्रह से मंगलवार को शाम 7,30 बजे तीन बच्चे फरार होने...

सांसद ज्ञानेश्वर पाटील के भाई के निधन पर शोक जताने बोहरड़ा पहुंचे मुख्यमंत्री डॉ...

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) खंडवा लोकसभा सांसद ज्ञानेश्वर पाटील के अनुज स्वर्गीय विश्वनाथ पाटील (बाडू भाई) के निधन पर प्रदेश के मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव बुधवार...

भुसावळ : घरफोडीत ४१ हजारांचा ऐवज लंपास ; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ : तालुक्यातील सुनसगाव येथे घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याने सुमारे ४१ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. या...

सगरवंशीय जिरेमाळी समाज बुऱ्हाणपूर नवीन कार्यकारिणी वर्ष 2026

0
बुऱ्हाणपुर (सुरज दहे )मध्य प्रदेश येथे श्री सगर वंशिय जिरे माळी समाज यांची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली व सत्कार समारोह आनंदात पार पडला. कार्यकारिणी व...

error: Content is protected !!