Homeक्राईमनाशिकच्या शहरी व ग्रामीण भागात तसेच बँगलोर, कर्नाटक येथे घरफोड्या करून फरार...

नाशिकच्या शहरी व ग्रामीण भागात तसेच बँगलोर, कर्नाटक येथे घरफोड्या करून फरार आरोपी ताब्यात!

गेल्या वर्षी इंदिरानगर परिसरात घरफोडी करून सोने चोरीला घेल्याची घटना घडली होती..

पोलीस वार्ता, नाशिक : शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी दि.8 मे 2025 रोजी घरफोडी करून सोने चोरीला घेल्याची घटना घडली होती. या संदर्भात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुरनं- 149/2025 भा.न्या.सं. कलम 305(अ), 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 करत असताना माहिती मिळाली की, सदर घरफोडी रोहन भोळे याने केली आहे. त्यानुसार तांत्रिक विश्लेषणावरून पोह. महेश साळुंके व पोअं. राहुल पालखेडे यांनी खात्रीशीर माहिती दिली. आरोपी नाशिक शहरातच फिरत आहे. पुढे पोअं. विलास चारोस्कर व पोअं. नितीन जगताप यांनी खबऱ्यांकडून गोपनीय माहिती मिळवली की, आरोपी विद्यानगरी, उपनगर, नाशिकरोड परिसरात येणार आहे. ही माहिती शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे वपोनि. डॉ.अंचल मुदगल यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पोउनि. चेतन श्रीवंत, पोअं. विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, गोरक्ष साबळे, राम बर्डे, मपोह. शर्मिला कोकणी यांचे पोलीस पथक तयार करून विद्यानगरी येथे पाठवण्यात आले. आरोपी संबंधित परीसरात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याला नाव विचारले असता त्याने रोहन संजय भोळे (वय-38), रा- विदयानगरी, उपनगर, नाशिक असे सांगितले. सदर गुन्ह्याची विचारणा केली तेव्हा त्याने सांगितले हा गुन्हा त्याने व त्यांचा मित्र आकाश कोठे यांनी मिळून केला आहे. तसेच त्याने आणखीन इतर गुन्हे देखील केलेले आहेत. ते खालील प्रमाणे..

1)सटाणा पो.स्टे, नाशिक ग्रामीण गुरनं- 95/2025 भा.न्या.सं. कलम 305(अ), 331(3) प्रमाणे गुन्हा.
2)सिन्नर पो.स्टे, नाशिक ग्रामीण गुरनं- 633/2025 भा.न्या.सं. कलम 305(अ), 331(3) प्रमाणे गुन्हा.
3)कोडी गेहाली, बँगलोर, कर्नाटक गुरनं- 428/2025 भा.न्या.सं. कलम 305(अ), 331(3) प्रमाणे गुन्हा.
पुढील पोलीस कारवाईसाठी आरोपी रोहन भोळे याला इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून करण्यात आली. पथकात पोउनि. सुदाम सांगळे, पोह. महेश साळुंके, देविदास ठाकरे, उत्तम पवार, जगेश्वर बोरसे, चालक पोअं/समाधान पवार, मपोह. मनिषा सरोदे यांचा देखील समावेश होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

विषारी दारूकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची आमदार रोहित पवारांनी घेतली भेट; दोशींच्या चौकशीची मागणी!

मृत्यू विषारी दारूमुळे झाला असताना संबंधित शासकीय यंत्रणांचे कुटुंबीयांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारण.. पोलीस वार्ता, पुणे : हडपसर परिसरात बनावट दारूमुळे मृत्यू झालेल्या मृत...

error: Content is protected !!