Homeक्राईमसाकरीत तरुणावर हल्ला; 8 जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

साकरीत तरुणावर हल्ला; 8 जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

लाकडी काठ्या व फावड्याच्या दांड्याने जबर मारहाण करत लाथाबुक्क्यांनी डोक्यावर, पाठीवर, हातापायांवर व खांद्यावर वार करून तरुणाला केले जखमी..

पोलीस वार्ता, भुसावळ : तालुक्यातील साकरी गावात एका तरुणावर गावातील आठ जणांनी संगनमत करून लाकडी काठ्या व फावड्याच्या दांड्याने हल्ला करून त्याला जबर मारहाण केल्याची गंभीर घटना सोमवार, दि.23 मार्च रोजी समोर आली आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार फिर्यादी सुनील सुरेश तायडे (वय-48) रा. तपत, कठोरा यांच्या फिर्यादीवरून प्रवीण बाविस्कर, दिनेश बाविस्कर, मोहन बाविस्कर, विकास काकडे, सागर सोनवणे, संजु तोंडे, माधुरी बाविस्कर व सुरेखा बाविस्कर सर्व राहणार साकरी, भुसावळ यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

सोमवार, दि.23 मार्च 2026 रोजी सकाळी 9:30 ते 10 वाजेदरम्यान साकरी येथील किन्ही रोडवर, खोकली माता मंदिरासमोर ही घटना घडली. फिर्यादीचा मुलगा हेमराज तायडे हा गावात कार घेऊन आल्याच्या कारणावरून आरोपींनी त्याच्यावर हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. आरोपींनी हातातील लाकडी काठ्या व फावड्याच्या दांड्याने जबर मारहाण करत लाथाबुक्क्यांनी हेमराजच्या डोक्यावर, पाठीवर, हातापायांवर व खांद्यावर वार करून त्याला जखमी केले. तसेच शिवीगाळ करत “विहिरीत फेकून देऊन जीवे ठार मारू” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोनि. महेश गायकवाड हे करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विभागीय आयुक्त कार्यालय येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होणार

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | देशात 80...

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.. पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

error: Content is protected !!