Homeउद्योगनारोद येथे कौटुंबिक त्रासातून मोठ्या भावानेच केला लहान भावाचा खून!

नारोद येथे कौटुंबिक त्रासातून मोठ्या भावानेच केला लहान भावाचा खून!

नारोद परिसरातील गुळी नदीवरील पुलावरून त्याला ढकलले. जखमी अवस्थेत असताना त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या झाली..

पोलीस वार्ता, चोपडा : जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील नारोद येथे मोठ्या भावानेच लहान भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दि.21 मार्च रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास ही घटना समोर आली असून आरोपी किरण पानाचंद पाटील (वय-27) याने त्याचा लहान भाऊ रोहन पानाचंद पाटील याची हत्या केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे. पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन पाटील याचा मृतदेह नारोद येथील गुळ नदी पात्रात संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. त्याच्या डोक्याला, गळ्याला तसेच पायाला गंभीर दुखापत झालेली होती. गावकऱ्यांनी ही माहिती पोलीस पाटील, विजय पाटील यांना दिल्यानंतर अडावद पोलीसांना यासंदर्भात कळविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, चोपडा विभागाचे डीवायएसपी आण्णासाहेब घोलप तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. काही तासांतच पोलीसांनी तपासाची दिशा निश्चित करत आरोपीला ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे शाखेने लावला छडा
तपासादरम्यान पोलीसांनी मृताच्या मोठ्या भावावर संशय घेत चौकशी केली. त्याच्या चेहऱ्यावर जखमा दिसून आल्याने पोलीसांनी विचारपूस केली असता सुरुवातीला  उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या किरणने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
असा घडला प्रकार
रोहन हा नशा करून आई-वडील व भावाला वारंवार त्रास देत होता. घरातील सततच्या वादाला कंटाळून किरणने दि.20 मार्च रोजी रात्री त्याला पैसे देऊन दारू पाजली. त्यानंतर नारोद परिसरातील गुळी नदीवरील पुलावरून त्याला ढकलले. जखमी अवस्थेत असताना त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पुढील तपास अडावद पोलीस करत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑर्ट ऑफ़ लिविंग के नियमित गुरुवार सत्संग के 18 वर्ष पूर्ण

0
उन्नीस वें वर्ष में होगा प्रवेश आज राजस्थानी भवन में होगा महासत्संग बैंगलोर के बाद सारे विश्व मे नियमित सत्संग के लिए बुरहानपुर की विशिष्ट...

शासकीय कार्य में बाधा डालने वाला फरार आरोपी महाराष्ट्र से गिरफ्तार

0
नेपानगर । शासकीय कार्य में बाधा उत्पन्न करने तथा कर्मचारियों को धमकाने के मामले में फरार चल रहे आरोपी को नेपानगर पुलिस ने महाराष्ट्र...

भोपाल : मंत्रि-परिषद बैठक में ₹5,960 करोड़ की योजनाओं को मंजूरी

0
शिक्षा, किसान और महिला कल्याण पर विशेष जोर भोपाल : मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव की अध्यक्षता में आयोजित मंत्रि-परिषद की बैठक में प्रदेश के सर्वांगीण...

जाट समाज धर्मशाला ओंकारेश्वर के नवीन भवन का भूमि पूजन संपन्न

0
काटकूट ( सुरज दहे ) ओंकारेश्वर में सोमवार, 22 जून को श्री जाट समाज धर्मशाला के नवीन भवन निर्माण हेतु भूमि पूजन कार्यक्रम विधि-विधान के साथ...

योग दिवस पर सरस्वती शिशु मंदिर में योग साधना का आयोजन, पत्रकार गोपाल देवकर...

0
दीप प्रज्वलन एवं सरस्वती वंदना के साथ हुआ शुभारंभ, विद्यार्थियों को नियमित योग अपनाने का दिया संदेश बुरहानपुर। अंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर सरस्वती...

error: Content is protected !!