मीनाक्षी ताई पोळ । सातारा जिल्हातिल उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात HPV लसीकरणाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. एचपीव्ही लसीकरण हे या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय असून साधारणपणे १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस देण्यास सुरुवात करण्यात आली असून भविष्यातील संसर्ग टाळण्यासाठी या वयोगटातील मुलींनी लस घ्यावी असे आवाहन उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेया खंडागळे यांनी केले.
उंब्रज ता.कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात HPV लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य रणजित जाधव व पंचायत समिती सदस्या संगीता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, सरपंच योगीराज जाधव, उपसरपंच सुनंदा जाधव, एडव्होकेट महादेव साळुंखे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रेया खंडागळे, डॉक्टर प्रियंका पंडित, आरोग्य निरिक्षक विकास गरुड, आरोग्य सहाय्यक दिगंबर भोसले , संगीता मगरे ,भारती वाघमारे तसेच आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका
व लसीकरणासाठी पात्र मुली त्यांचे पालक उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आला. डॉक्टर श्रेया खंडागळे यांनी सांगीतले की एचपीव्ही लसीकरण महिलांमध्ये उद्भवणाऱ्या स्तनांच्या व गर्भाशयातील मुग्गाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. साधारणपणे १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस अधिक प्रभावी मानली जात आहे. लस सुरक्षित असून तिचे दुष्परिणाम अत्यल्प असतात. लसीकरणामुळे शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते आणि भविष्यातील संसर्ग टाळता येतो. प्रास्ताविक विकास गरुड यांनी केले. डॉ. प्रियंका पंडित यांनी आभार मानले. यावेळी लसीकरण करून घेतलेल्या मुलींना प्रमाणपत्र देण्यात आले.
उंब्रज: उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात HPV लसीकरणाचा शुभारंभ प्रसंगी समाजसेवी मान्यवर उपस्थित होते ।




































