Homeआरोग्यशहराच्या सौंदर्यीकरणातून कुंभमेळ्याचा संदेश आणि जिल्ह्याचे एकत्रित दर्शन घडावे आयुक्त शेखर सिंह...

शहराच्या सौंदर्यीकरणातून कुंभमेळ्याचा संदेश आणि जिल्ह्याचे एकत्रित दर्शन घडावे आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन!

नाशिक जिल्ह्याला लाभलेले अध्यात्म, ऐतिहासिक, सांस्कृतिक, पौराणिक वारश्याचे प्रतिबिंब येणाऱ्या कुंभमेळ्या दरम्यान उमटले पाहिजे..

पोलीस वार्ता, नाशिक : त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यानिमित्त राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे सुरू आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त कोट्यवधी भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येतील. यावेळी शहर सौंदर्यपूर्ण आणि आकर्षक ठेवणे, सुशोभिकरण, दिवाबत्ती, हिरवेगार पट्टे, भित्ती चित्रे, सांस्कृतिक वैभवाची आकर्षक मांडणी यासह स्वच्छतेबाबत नियोजनासाठी प्राधिकरणाच्या सभागृहात आज दि.26 डिसेंबर 2026 रोजी दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहरांचे सौंदर्यीकरण महत्वाचे आहे. नाशिक जिल्ह्याला लाभलेले अध्यात्म, ऐतिहासिक, सांस्कृतिक, पौराणिक वारश्याचे प्रतिबिंब येणाऱ्या कुंभमेळ्या दरम्यान उमटले पाहिजे. यासाठी कला क्षेत्रातील कलावंत, तज्ज्ञ व्यक्तींनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी येथे केले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे प्राधिकरणाच्या माध्यमातून सौंदर्यीकरण केले जाईल. येणाऱ्या भाविकांना सौंदर्यीकरणातून अध्यात्म आणि जिल्ह्याच्या समृद्ध अशा वारशाचे दर्शन घडले पाहिजे. त्यासाठी रेल्वे स्थानक, त्र्यंबकेश्वर येथील दर्शन पथ, रामकाल पथ, या दोन्ही शहरांकडे जाणारे मार्ग, विमानतळ, उड्डाण पूल, प्रवेशद्वार, घाट, टेन्ट सिटी, बसस्थानक, ऐतिहासिक वास्तू आदींचे शास्त्रोक्त पद्धतीने आणि उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून सौंदर्यीकरण आवश्यक आहे. सौंदर्यीकरणाचे काम सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी झाले पाहिजे, असे नियोजन करावे. याबरोबरच प्रदर्शनी, शिल्पकला, लोककलेचा वापर करून सौंदर्यीकरणावर भर द्यावा. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल. त्यासाठी ठिकाणे निश्चित करून प्राधिकरणाच्या सदस्यांसमवेत संवाद साधावा. या सौंदर्यीकरणातून कुंभमेळ्याच्या संदेश आणि जिल्ह्याचे एकत्रित दर्शन घडले पाहिजे, असेही आयुक्त शेखर सिंह यांनी बैठकीत सांगितले.
महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या माध्यमातून सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येईल. त्यासाठी कलावंत, तज्ज्ञांनी सहकार्य, मार्गदर्शन करावे. अधीक्षक अभियंता श्रीमती शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सौंदर्यीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, उपविभागीय अधिकारी पवन दत्ता (इगतपुरी), सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, नवनाथ सोनवणे, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता स्नेहल पगार, वास्तुविशारद राधिका रौनक भट्टड, निकेता काटके-व्हटकर, अंकुश जगताप, शिशिर शिंदे, अमित सारडा, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, कलावंत, अभियंता, वास्तुविशारद आदी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

error: Content is protected !!