भुसावळ : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नमुना-६ अंतर्गत नामनिर्देशन मागे घेण्याची अधिकृत सूचना प्रसिद्ध केली आहे. या सूचीनुसार,बारा वैधपणे नामनिर्दिष्ट उमेदवारांनी ता.२० रोजी आपली उमेदवारी मागे घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये पिंजारी जुलेखाँ अकील, पुजा अजय विसपुते, ज्योती आंनद अवसरमल, विजय मोतीराम चौधरी, शे. सलीम शे. नादर, बागवान समरीन जुबेर, वैभव युवराज लोणारी, अहिरे गौरी दिनेश, अनिकेत प्रविण पाटील, देवेंद्र सिताराम वाणी, नितीन राजेंद्र वाघ आणि यामिनी जितेंद्र राणे यांचा समावेश आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या माहितीनुसार,उमेदवारांनी स्वेच्छेने आणि वैध पद्धतीने आपली उमेदवारी मागे घेतली असून, ही प्रक्रिया नियम ९ (२) नुसार पार पडली आहे. भुसावळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे पुढील निवडणूक प्रक्रियेत काही बदल होण्याची शक्यता आहे.अशी निवडणूक निर्णय अधिकारी, भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक जितेंद्र पाटील यांनी दिली .
























