भाजपने जळगाव जिल्ह्यात तीन ठिकाणी बिनविरोध खाते उघडून आघाडी घेतली आहे, जामनेर नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ.साधना गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड..
पोलीस वार्ता, जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुक 2025 ची राज्यात धामधूम सुरू असून मंगळवारी दि.18 नोव्हेंबर 2025 रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत अनेक उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद ठरविण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान भाजपाचे तीन ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध निश्चीत झाले. यात भुसावळ मधील वार्ड क्र. 7-अ मधून भाजपच्या प्रीती मुकेश पाटील, जामनेरमध्ये वार्ड क्र. 11-ब मधून भाजपच्या उज्वला दीपक तायडे तर सावदा मधून वार्ड क्र. 7-अ येथून भाजपच्या रंजना जितेंद्र भारंबे बिनविरोध निवड निश्चीत झाल्या आहेत.
नगरपरिषद व नगरपालिका निवडणुक 2025 यात मंगळवारी अनेक मातब्बरांचे उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले. दरम्यान, मतदान होण्याआधीच भाजपने जळगाव जिल्ह्यात तीन ठिकाणी बिनविरोध खाते उघडून आघाडी घेतली आहे. अशात पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे जामनेर नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ.साधना गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड निच्छित झाली आहे. विशेष म्हणजे सौ.साधना महाजन यांनी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड होऊन त्यांनी हॅट्रिक केली आहे. जामनेर नगरपरिषद निवडणुकीत मंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वात हा विजय मिळाला आहे.
जामनेर नगरपरिषद मतदानापूर्वीच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना गिरीश महाजन या बिनविरोध निवडून आल्याने आता जामनेर नगरपरिषदेवर पुन्हा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिल्याचे दिसते आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, जामनेर व सावदा या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक पदाचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून जिल्ह्यातील ठिकाणी जल्लोष करण्यात आला. विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवारांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या तीन जागांवर भाजपला बिनविरोध नगरसेवक पदाचे यश मिळाले.
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी..
पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...