अतिथी व अधिकारी वर्गासह 150 पुरुष होमगार्ड व 60 महिला होमगार्ड रक्षक ध्वजारोहणाला उपस्थित..

पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र होमगार्ड संघटनेच्या नाशिक जिल्हा होमगार्ड कार्यालयात 15 ऑगस्ट(2025) रोजी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक मा.आदित्य मिरखेलकर आणि होमगार्ड जिल्हा समादेशकांच्या मार्गदर्शनात डी.वाय.एसपी नाशिक ग्रामीण मा.नितीन कुमार (गोकावे) या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी बोलतांना डी.वाय.एसपी नितीन कुमार यांनी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ दिली व या संदर्भात समाजामध्ये जनजागृती करण्याची सर्वांना प्रेरणा दिली. यावेळी प्रशासिक अधिकारी सुरेश जाधव, केंद्रनायक हारून तडवी, पलटण नायक, शांतीलाल निनावे, परेड कमांडर अभिमन्यू दैतकर, कंपनी नायक तथा समादेशक अधिकारी दिनेश पवार, वरिष्ठ पलटण नायक श्रीकांत जाधव, रमेश कळमकर, पलटण नायक तथा अंशकालीन लिपिक प्रशांत सुधाकर चौधरी, पलटण नायक सुमंत महाजन, विनय शिंत्रे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, सार्जंट गौतम जाधव, विनोद वानखेडे, छगन वाघ, संतोष शेलार, सुमन राऊत, नसरीन शेख, संगीता पगारे, भाग्यश्री जाधव, मेघमाला जाधव यांनसह 150 पुरुष होमगार्ड व 60 महिला होमगार्ड रक्षक ध्वजारोहणाला उपस्थित होते.






































