नियुक्तीपत्र देऊन येवला पीआरपी महिला आघाडी आणि येवला पीआरपी तालुका कार्यकारणीच्या नियुक्त्या बैठकीत जाहीर..

पोलीस वार्ता, नाशिक : पीपल्स रिपब्लिकन पार्टीची येवला तालुका कार्यकारणी बैठक दि.27 जुलै 2025 रविवार रोजी येवला शहरात संपन्न झाली. ही बैठक राष्ट्रीय नेते मा. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या मार्गदर्शनात आणि प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवने यांच्या आदेशाने पीआरपी नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड.शशीभाई उन्हवने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी गोरगरीब जनतेचे शासन दरबारी असलेले प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना पक्षाच्या माध्यमातून न्याय व दैनंदिन सुविधा, सरकारी योजना नियमित मिळाव्या यासाठी पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या येवला तालुक्यात करण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्या महिलांनी सरकारी योजना मिळविण्यासाठी येणाऱ्या विविध अडीअडचणी जिल्हाध्यक्षांसमोर मांडल्या.

बैठकी प्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड.शशीभाई उन्हवने यांचे स्वागत करून त्यांनी वकील MA.LLB पदवी मिळविल्या बद्दल त्यांचे उपस्थित सर्वांच्या वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले.

तसेच पीआरपीचे नेते राज निकाळे आणि इतर उपस्थित मान्यवरांचे यांचे देखील स्वागत सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे संपर्ण सूत्रसंचालन रंजीत संसारे यांनी केले.

जिल्हाध्यक्ष ॲड.शशीभाई उन्हवने यांनी नियुक्तीपत्र देऊन पीआरपी महिला आघाडी आणि पीआरपी तालुका कार्यकारणीच्या नियुक्त सर्वांचे अभिनंदन करून पक्षाच्या ध्येयधोरणा नुसार पुढील कामाला लागण्याच्या शुभेच्छा दिल्या!
-
पीआरपी येवला तालुका कार्यकारणी
रणजीत निवृत्ती संसारे (तालुकाध्यक्ष)
रावसाहेब कांबळे (उपाध्यक्ष)
भीमराव खळे (जि.उपाध्यक्ष ग्रामीण)
नंदू सुकदेव शिंदे (सचिव)
सुखदेव बाबुराव झिंजोडे (संघटक)

-
पीआरपी महिला आघाडी, येवला तालुका
शांताबाई पोपट झाल्टे (तालुकाध्यक्ष)
सुमनबाई पठारे (उपाध्यक्ष)
कांताबाई झाल्टे (सचिव)
रंजना अरुण आहिरे (संघटक)
✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, नाशिक, संपर्क- 9637519059