Homeआरोग्यनदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू.. उद्योग मंत्री उदय सामंत

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू.. उद्योग मंत्री उदय सामंत

पिंपरी-चिंचवड, पुणे आणि परिसरातील पवना, इंद्रायणी, मुळा-मुठा नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे संपूर्णपणे शुद्धीकरण..

पोलीस वार्ता, पुणे : राज्यातील महत्त्वाच्या नद्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी सरकारने तीन टप्प्यांत प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे आणि परिसरातील पवना, इंद्रायणी, मुळा-मुठा नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे संपूर्णपणे शुद्धीकरण करण्यासाठी हे प्रकल्प राबवले जात आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
विधानपरिषद सदस्य श्रीमती उमा खापरे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांचे पुनरूज्जीवन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. विधानपरिषद सदस्य सचिन अहिर यांनीही उपप्रश्न विचारला. याबाबत अधिक माहिती देताना उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, इंद्रायणी आणि पवना नदी प्रकल्पाचा (PMRDA मार्फत) एकूण खर्च 671 कोटी असून यास 60 टक्के केंद्र शासन, 40 टक्के पीएमआरडीए निधी वाटप करण्यात येणार आहे.
पवना नदी प्रकल्पाचा (PMRDA मार्फत) खर्च 218 कोटी असून याबाबतचा निधी 60 टक्के केंद्र, 40 टक्के स्थानिक तर सीईटीपी प्रकल्पाचा खर्च (MIDC मार्फत) 1200 ते 1500 कोटी असून एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक सांडपाण्याची शुद्धता तपासणे हा याचा उद्देश आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी ‘जायका’ कडून कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू असून प्रस्ताव दाखल केला गेला आहे. यावर इंद्रायणी-पवना नद्यांचे उगमापासून संगमापर्यंत संपूर्ण शुद्धीकरण करण्यात येणार आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदी येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले असल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली या तीनही विभागांची बैठक होईल, असेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी : वर्षा चव्हाण, बारामती, संपर्क: 9763852891
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!