आकाशातून वीज सरळ पडसाच्या झाडावर येऊन पडली आणि या घटनेत झाडाखाली उभ्या असलेल्या सर्व 22 बकऱ्या जागीच मृत्युमुखी पडल्या..
पोलीस वार्ता, वणी : राज्यातील अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. कुठे शेत मालाचे नुकसान तर कुठे जीवित हानी पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना रविवारी 18 मे रोजी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात वरूड(नेत) येथील शेत शिवारात घडली. अचानक आलेल्या अवकाळी पावसाच्या विजांच्या कडकडाकासह शेतकऱ्याच्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. वीज पडल्याने झाडाखाली आश्रयासाठी बांधलेल्या 22 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत स्थानिक मजुराचे अंदाजे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
वरूड (नेत) येथील रहिवासी भारत तुकाराम गेडाम हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मालकीची शेती नसल्यामुळे ते बकऱ्या पालनाचा जोड व्यवसाय करून आपला व कुटुंबाचा खर्च भगवतात. दररोजप्रमाणे त्यांनी आपल्या बकऱ्या रविवारी 18 मे रोजी गावातील एका शेतकऱ्याच्या शतात चरण्यासाठी नेल्या होत्या, दुपारी साधारण 5 वाजेच्या सुमारास अचानक आकाशात ढगांचा गडगडाट ऐकू येऊ लागला, पावसाने ढग दाटून आले आणि वाऱ्यासह वीजांचा कडकडाट चालू होऊन काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे घाबरून बकऱ्या परतीच्या दिशेने धावू लागल्या. मात्र यातील 2 बोकड आणि 20 बकऱ्या शेतात असलेल्या पडसाच्या झाडाखाली उभ्या राहिल्या.
काही वेळातच आकाशातून वीज सरळ पडसाच्या झाडावर येऊन पडली आणि या घटनेत झाडाखाली उभ्या असलेल्या सर्व 22 बकऱ्या जागीच मृत्युमुखी पडल्या. ही घटना इतकी भीषण होती की काही समजण्याच्या आतच वीज जनावरांचा जीव घेऊन गेली. गेडाम यांच्या मृत्यू झालेल्या बकऱ्यांमध्ये एक बकरी शंकर गोविंदा नगोसे यांची व एक बकरी रामकृष्ण शामराव उराडे यांची असल्याची त्यांनी सांगितले. विशेषबाब म्हणजे, यावेळी बकऱ्यांसोबत असलेले भारत गेडाम हे या घटनेत थोडक्यात बचावले गेले असून त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांना तातडीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार, गेडाम यांचे उदरनिर्वाह बकऱ्यांच्या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यांच्याकडे इतर कुठलाही शाश्वत उत्पन्नाचा कोणताही पर्याय नाही. बकऱ्या हेच त्यांची संपत्ती व मुख्य आर्थिक स्त्रोत होते. या दुर्घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने नुकसानीचा पंचनामा करून भरपाईचा अहवाल शासनाकडे लवकरात लवकर सादर करावा, आणि गेडाम यांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळून त्यांचे जीवन पूर्ववत कसे होईल ह्या दृष्टीने विचार करावा अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...
रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे..
पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....