Homeक्राईममहसूल विभागाकडून अवैध वाळू वाहतुकीचे चार वाहने जप्त

महसूल विभागाकडून अवैध वाळू वाहतुकीचे चार वाहने जप्त

भुसावळ – तालुक्यामध्ये बांधकामांना ऊत आला आहे. ठेकेदार परस्पर बांधकामासाठी लागणारी वाळूची खरेदी करीत अव्वाच्या सव्वा पैसे ग्राहकांकडून वसुली करीत असुन मात्र शासनाचा महसूल बुडवित आहे.तहसीलदार भुसावळ नीता लबडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज वाहतूक प्रतिबंधात्मक कार्यवाही करता पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.पथकाने सुनसगाव कुऱ्हे, जळगांव रोड तसेच वांजोळा रोड फाटा आदित्य लॉन्स व भुसावळ शिवार राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ खडका रोड चौफुली असे भागामध्ये वैध परवाना तसेच पावती नसल्याने वाहतुक अवैधरित्या करीत असल्याने चार वाहने जप्त केली आहे.

तहसीलदार भुसावळ नीता लबडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ता.१४ रोजी सकाळी साडे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान अवैध गौण खनिज वाहतूक प्रतिबंधात्मक कार्यवाही करता पथक सुनसगाव कुऱ्हे प्रन रोडवर गस्त घालतांना सुंदर किशोर मानकर यांच्या मालकीचे ट्रॅक्टर

(क्र.एम.एच.३४ बी.जी. ४५१५) हे ट्रॅक्टर सुनसगांव गावाच्या दिक्षेकडुन गोजोरे या गावाकडेस येत असता वाहन तपासणी केली असता वाळू या गौण खनिजाची वाहतुक केले जात असले बाबत अढळुन आले वाहन चालक यांचे कडेस वाळु वाहतुकीचा कोणताही वैध परवाना अगर पावती नसल्याने सदरची वाहतुक अवैधरित्या करीत असल्याने सदर वाहन जप्त केले असुन वाहनाचा पंचनामा करणेत आलेला असुन वाहनात एक ब्रास वाळु अढळुन आला असुन दंडात्मक कार्यवाही होणे कामी पहिली कारवाई करीत वाहन तहसील कार्यालयात जमा केले आहे.

दुसरी कार्यवाही जळगाव गावच्या दिशेकडून पिवळ्या रंगाचे डंपर (एम.एच.१९ झेड ४९२३) विशाल नामदेव सपकाळे राहणार जळगाव यांच्या मालकीचे तपासणी करता थांबवले असता सदर वाहनांमध्ये वाळू या गौणखनिज ची वाहतूक होत होती वैध परवाना अगर पावती नव्हती त्यामुळे सदर वाहन जप्त करण्यात आले असून वाहन व वाहनातील दीड ब्रास वाळु असले बाबत गौणखनिजाचा पंचनामा केलेला असुन वाहनावर दंडात्मक कार्यवाही कामी वाहन तहसील कार्यालयात जमा केले आहे. पथक मधील कर्मचाऱ्यांचे नाव प्रवीण पाटील मंडळ अधिकारी कुऱ्हे प्र.न, साधना खुळे तलाठी गोजोरे, सुनिता वळवी तलाठी सूनसगाव, नितीन केले तलाठी वराडसिम, मिलिंद तायडे तलाठी साकेगाव, जितेश चौधरी कोतवाल साकेगाव व संदीप पाटील वाहन चालक तहसील कार्यालय भुसावळ हे होते

तिसरी कार्यवाही ता.१५ रोजी वांजोळा रोड फाटाआदित्य लॉन्स जवळ पिवळे रंगाचे डंपर तपासणी कामी थांबविले असता सदर वाहनात वाळु हया गौणखनिजाची वाहतुक केली जात असल्याचे अढळुन आले वाहन चालकाकडेस तपासणी वेळी कोणताही वैध परवाना अगर पावती नव्हती वाहनाचा क्रमांक ( जी.जे.०४ ऐ .यु.७४०४) असा असुन वाहन मालक मंगल देविदास कोळी यांचे मालकीचे असुन वाहन मालक यांचे सांगणेवरुन सुजदे भोलाणे शिवार तापी नदी पात्रातुन चोरटया मार्गाने मजुराचे सहाय्याने वाळुचा भरणा करुन भुसावळ येथे खाली करीत असल्याचे वाहन चालक यांचे जाबाब मध्ये नमुद केले आहे सदर वाहन व वाहनाचा पंचनामा केलेला असुन वाहनात दोन ब्रास वाळु एवढे असुन वाहनावर दंडात्मक कार्यवाही होणे कामी सदरचे वाहन जप्त करुन तहसिल कार्यालय, भुसावळ येथे जमा केलेले आहे.

चौथी कार्यवाही भुसावळ शिवार राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ खडका रोड चौफुली वाहन क्र.( एम.पी-४८,एच- ०४७१) हे डंपर वाहन साकेगांव गावाच्या दिशेकडुन भुसावळ कडेस वाहतुक करीत असतांना पुढे मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांचे सयुक्तीक पथकांने सदरचे वाहन तपासणी कामी थांबविले वाहानात वाळु हया गौणखनिजाची वाहतुक होत होती वाहन चालकाकडेस मागणी केली असता तपासणी वेळी परवाना अथवा ईटीपी नव्हती त्यामुळे सदरचे वाहन ताब्यात घेऊन वाहनाचा पंचनामा केलेला आहे वाहन मालक संदिप बेनीलाल परदेशी रा.साकेगांव ता. भुसावळ व आर सी बुक नुसार अमोल मालवीय असे आहे अवैध गौणखनिज वाहतुक केले प्रकरणी दंडात्मक कार्यवाही करणे कामी तहसिल कार्यालय, भुसावळ येथे जमा केलेले आहे सदर पथकात रजनी तयाडे मंडळ अधिकारी वरणगांव, प्रविण पाटील मंडळ अधिकारी कुऱ्हे प्र.न.मंगेश पारीसे,तलाठी तळवेल,सुनिता वळवी तलाठी सूनसगाव हे होते.पुढे ही अशाप्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती तहसीलदार नीता लबडे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!