Homeआरोग्यथकीत आणि शासन निर्णयानुसार त्वरित मानधन द्यावे; अन्यथा ग्राम रोजगार सेवक संघटनेचा...

थकीत आणि शासन निर्णयानुसार त्वरित मानधन द्यावे; अन्यथा ग्राम रोजगार सेवक संघटनेचा कामबंद आंदोलनचा इशारा!

ग्रामरोजगार सेवकांना आठ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा 3 आक्टोबर 2024 रोजी शासनाकडून करण्यात आली आहे, तसा शासन निर्णयही निघाला आहे..

पोलीस वार्ता, वणी : तालुक्यातील ग्रामीण भागात रोजगार हमी योजना अंतर्गत होणाऱ्या वैयक्तिक लाभासह सार्वजनिक कामांचा लेखाजोखा व समन्वयक म्हणून काम पाहणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांचे मानधन प्रशासनाकडून सहा महिन्यांपासून देण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्यात ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामावर आधारित अनिश्चित मानधनावर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना आठ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा 3 आक्टोबर 2024 रोजी शासनाकडून करण्यात आली आहे, तसा शासन निर्णयही निघाला मात्र आज अखेर ग्रामरोजगार सेवकांना मानधनच मिळाले नाही.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जबाबदारी गावपातळीवर सरपंच आणि ग्रामसेवकांवर देण्यात आली आहे. या कामात ग्रामपंचायत स्तरावर अभिलेख आणि नोंदवह्या ठेवण्यासाठी मदत करण्याची आणि प्रत्यक्ष काम करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची अर्धवेळ स्वरूपात नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी ग्राम रोजगार सेवकांना अकुशल कामावर मनुष्य दिवसांच्या मजुरी खर्चावर आधारित मानधन देण्यात येत होते. ज्या गावात जास्त काम त्या गावातील ग्राम रोजगार सेवकांना चांगले मानधन होते. तर ज्या गावात कमी काम त्या गावातील ग्राम रोजगार सेवकांना तुटपुंजे मानधन मिळत होते.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील वैयक्तिक सिंचन विहीर, फळबाग लागवड योजना यासह इतर कामे व पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना त्याचबरोबर शौचालय ही सर्व विविध कामे करून घेणे, त्यावर लक्ष ठेवून प्रशासन व लाभार्थ्यांमध्ये समन्वयाची भूमिका पार पाडून संबंधित घटकासाठी असलेले अनुदान लाभार्थ्याच्या पदरात पाडून देणे, यासह विविध कामे ग्राम रोजगार पार पडतात.

परंतु सध्या ग्रामरोजगार सेवकांचे कामाच्या मोबदल्यात मिळणारे अल्प मानधनही मागील सहा महिन्यांपासून थकीत आहे. याबाबत पंचायत समितींना वारंवार कल्पना देऊनही काही झाले नाही. राज्य सरकारने या प्रश्नांवर लक्ष देऊन थकीत मानधन द्यावे. अशी मागणी ग्राम रोजगार सेवक संघटना वणी यांचे वतीने करण्यात आली आहेत. संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी याना देण्यात आला असून यावेळी वणी रोजगार सहाय्यक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!