कै.जिजाबाई रतनराव चव्हाण ह्या मा.नगरसेवक संजय(आप्पा) चव्हाण व उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष प्रकाश (बापू) चव्हाण यांच्या काकू आहेत..
पोलीस वार्ता, नाशिक : जुने नाशिक येथील मोहन मास्तर तालीमचे नामवंत पैलवान कै.रतनराव चव्हाण यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रविण चव्हाण यांच्या मातोश्री श्रीमती जिजाबाई रतनराव चव्हाण यांचे वयाच्या 84 व्या वर्षी, दि.22 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 4 वाजता निधन झाले आहे.

त्या शिरीषकुमार चौक, पाटील गल्ली, जूने नाशिक येथे वास्तव्यास होत्या. त्या मा.नगरसेवक संजय(आप्पा) चव्हाण व उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष प्रकाश (बापू) चव्हाण यांच्या काकू आहेत.
त्यांच्या निधनाने कुटुंब, नातेवाईक दुःखात असून यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे, सुना, जावई, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे.





































