Homeउद्योगवणी वेकोली येथील कंपनीच्या व्यवस्थापकांविरोधात सलग दुसऱ्या दिवशी कामगारांचे उपोषण सुरूच..

वणी वेकोली येथील कंपनीच्या व्यवस्थापकांविरोधात सलग दुसऱ्या दिवशी कामगारांचे उपोषण सुरूच..

सोमवारी दि.27 जानेवारी रोजी कंपनी व्यवस्थापकांकडून प्रतिनिधी स्वरूपात मॅनेजर व इनचार्ज यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली, मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत निरोप देण्याचे आश्वासन दिले होते.

पोलीस वार्ता, यवतमाळ : वणी, वेकोली येथील एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 65 कामगारांना एकदम कामावरून काढून टाकल्यानंतर कंपनीविरोधात कामगारांनी दि.27 जानेवारी, सोमवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. कंपनीच्या गेटसमोर कामगारांनी ठिय्या मांडला असून आज मंगळवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता. मात्र संध्याकाळ पर्यंत कंपनी व्यवस्थापकांकडून उपोषणकर्त्यांशी व्यवस्थित पूर्ण बोलणी झालेली नाही. वेकोलिचे कामगार नेते टीएससी मेंबर संजय खाडे यांनी देखील उपोषणकर्त्यांना भेट देत पाठिंबा जाहीर केला आहे. कामगारांना न्याय मिळावा यासाठी वरिष्ट पातळीवर चर्चा करून जो पर्यंत कामागारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कामगारांसोबत राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
गेल्या 5 वर्षांपासून एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा.लि. ही कंपनी निलजई ओपनकास्ट खाणीसाठी ओ.बी.उत्खननाचे काम करते आहे. या कामासाठी एचडी एन्टरप्राईजेस या कंपनीचे 35 डंपर व गौरव जॉइंट वेंचर या कंपनीचे 60 डंपर कार्यरत आहेत. सध्या ही कंपनी पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. मात्र असे असूनही या कंपनीत काम करणाऱ्या 65 कामगारांना नोकरीवरून एकदम कमी करण्यात आले. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कंपनीव्यवस्थापका विरोधात कामगारांनी यलगार पुकारला असून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
उपोषण स्थळी एसडीपीओ गणेश किंद्रे, पीएसआय रावसाहेब बुधवट, शिरपूरचे ठाणेदार माधव शिंदे यांच्यासह प्रमोद वासेकर, राजू अकंतवार, तेजराज बोढे, शंकर वऱ्हाटे, अशोक चिकटे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या. सोमवारी दि.27 जानेवारी रोजी कंपनी व्यवस्थापकांकडून प्रतिनिधी स्वरूपात मॅनेजर व इनचार्ज यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली आणि कामगारांच्या मागण्या व्यवस्थापकांपर्यंत पोहोचवून मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत निरोप देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आज मंगळवार रात्री पर्यंत कंपनीकडून निरोप न आल्याने उपोषण सुरूच आहे.
संजय खाडे यांनी कामगारांचे उपोषण त्यांच्या हक्कासाठी असल्याचे सांगितले असून ते पुढे म्हणाले स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देणे हे कंपनीचे कर्तव्य आहे. मात्र कंपनी भूमिपुत्रांवरच अन्याय करीत आहे. कामगारांचे उपोषण त्यांच्या हक्कासाठी असून कंपनीने त्यांना तात्काळ नोकरीवर रुजू करावे.
उपोषणकर्त्यांमध्ये विशाल गोवारदीपे, कानुजी लोनगाडगे, प्रभाकर खोब्रागडे, संदीप भोयर, रवि गुरनुले, प्रविण कातारकर, मनोज खाड़े, प्रकाश इंगोले, श्रीकांत निंदेकर, अरुण डाहुले, अनिल डोंगे, वासुदेव चिडे यांच्यासह सुमारे 40-50 कामगारी भाग घेतला असून उपोषणाचा लढा उभा केला आहे. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वणी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!