Homeउद्योगभुसावळमध्ये सिनेस्टाईल गोळ्या झाडून खून का बदला खून; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

भुसावळमध्ये सिनेस्टाईल गोळ्या झाडून खून का बदला खून; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

खूनाची घटना शुक्रवार 10 जानेवारी रोजी घडली. याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील जाम मोहल्ला भागातील शालिमार हॉटेल जवळील डी.डी सुपर कोल्ड्रिंक्स अँण्ड टी हाऊस दुकानांमध्ये तैरींम अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख व जवाई जाकीर मेहबूब खान हे दोघे सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास चहा पित होते. दुकानाजवळ अचानक पाच ते सहा इसमांनी हातात बंदूक घेऊन तैरींम अहमद यास शिवीगाळ करीत सिनेस्टाईल गोळ्या झाडून खून का बदल खून करण्यात आल्याची घटना शुक्रवार 10 जानेवारी रोजी घडली.याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यादरम्यान नेहमी प्रमाणे तैरींम अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख व जवाई जाकीर मेहबूब खान हे दोघे सकाळी 6 वाजेला नमाज पठण करण्यासाठी जायचे व त्यानंतर डी.डी सुपर कोल्ड्रिंक्स अँण्ड टी हाऊस दुकानांमध्ये नेहमीप्रमाणे चहा पित असत. मागील वर्षी खडका रोडवरील हिरा हॉल जवळ पटेल परिवारातील एका युवकांचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला अठरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचाच डाव मनात धरीत “पीछले साल हमारे भाई को मार डाला” असे बोलून संशयित आरोपी तनविर मजीत पटेल, अनवर पटेल, रमीज पटेल, शेख साहिल शेख रशीद,मजीत पटेल, अदनान शेख युनूस अशांनी मिळून जाम मोहल्ला भागातील डी.डी सुपर कोल्ड्रिंक्स अँण्ड टी हाऊस दुकानांमध्ये तैरींम अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख यांच्यावर बंदुकीने तीन गोळ्या झाडून खून करून पसार झाले आहे.बाजारपेठ पोलीस स्टेशनला जाकीर मेहबूब खान (वय 45) राहणार जाम मोहल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहे. सदरील खून प्रकरणातील संशयितांनी एकप्रकारे पोलिसांना आव्हानच केले आहे.
  • पोलिसांचा ताफा दाखल..
सदरील घटना ही पूर्ववैमनस्यातून झालेली असून तैरींम अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख (मयत) यास मारण्यासाठी बाहेरील काही सुपारी किलर यांना बोलावून हा खून करण्यात आल्याची शक्यता आहे. खून करणारे इसमांनी उंची सहा फूट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून यांनी गोळ्या झाडून कित्येक वेळेपर्यत बिनधास्तपणे शहरातच वावरत होते.सदरील घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ त्याचप्रमाणे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
  • ठसे तज्ञ युनिट दाखल..
जळगांव येथील ठसे तज्ञ युनिट मधील पोलीस हवालदार निलेश भावसार,किरण चौधरी, शिवदास नाईक अशांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली व नमुने घेतले.
  • श्वान पथक दाखल..
सदरील घटना ही गोळ्या झाडून खून करण्यात
आला आहे.या घटनेतील संशयित आरोपींचा लवकरात – लवकर शोध घेण्याकामी वरिष्ठांचा आदेशावरून श्वान पथकास भुसावळात पाचारण करण्यात आले आहे.मात्र पोलिसांना कुठलेही संशयित आरोपी मिळून आलेले नसून शेवटी अपयश आलेले आहे.
  • शहरातील दुकाने बंद …
जाम मोहल्ला परिसरातील पाच ते सहा इसमांनी चहाच्या दुकानात गोळ्या झाडून खून केल्याने या घटनेत एक इसम जागीच मयत झाल्याने जाम मोहल्ला भागातील व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली.
  • शहरात वाहतूक शाखेचा बंदोबस्त..
सदरील परिसर हा संवेदनशील असून झालेल्या घटनेचे काही पडसाद शहरात उमटू नये या अनुषंगाने जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता.सदरील घटनेमुळे वाहतुकीची कोंडी होवू नये त्याचप्रमाणे काही व्यापाऱ्यांचे नुकसान होवू नये या पाश्वभूमी वर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले यांच्या उपस्थितीत जाम मोहल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला होता.पोलिसांचा मोठा जमाव असल्याने एकप्रकारे पोलीस छावणीचे स्वरूप निर्माब झाले होते.
  • संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, फुटेज व्हायरल!
भुसावळ शहरातील जाम मोहल्ला भागातील शालिमार हॉटेल जवळील डी.डी सुपर कोल्ड्रिंक्स अँण्ड टी हाऊस दुकानांमध्ये गोळ्या झाडून खून करणारे संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे फुटेज व्हाट्सअप वर व्हायरल झाले आहे.
“दोन दिवसांपूर्वीच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी भुसावळ पोलीस उपविभागातील पोलीस स्टेशनला भेट देवून पाहणी केली व उकृष्ठ कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले.मात्र प्रसार माध्यमांनी तालुक्यातील गुन्हेगारी, अवैध धंदे, हद्दीपार, बनावट नोट प्रकरण, महिला विनयभंग, मोबाईल चोरी, मोटरसायकल चोरी, अवैध गौण खनिज असे अनेक प्रश्न विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या समोर मांडण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना टाळाटाळ केली .”

✍️पोलीस वार्ता न्यूज टीम : भुसावळ
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!