31 जानेवारी 1920 रोजी सुरु झालेल्या “मूकनायक” वर्तमानपत्राचा सन्मान आणि मानवंदन म्हणून या दिवसाला ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

पोलीस वार्ता, शेगाव : शेगाव येथे दि.4 जानेवारी 2025 रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आंबेडकरी पत्रकार समूहाच्या ‘आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरम’ची महत्त्वाची वार्षिक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत 31 जानेवारी रोजी शेगाव, जि.बुलडाणा येथे ‘मूकनायक’ सन्मान सोहळा व ‘पत्रकार दिन’ भव्य-दिव्य स्वरूपात साजरा करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

शेगाव शहरातील शासकीय रेस्टहाऊस येथे आयोजित बैठक मध्ये प्रमुख व्यक्तींनी आपली उपस्थिती दर्शविली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष उत्तम वानखडे होते. तसेच, केंद्रीय सचिव प्रकाश सरदार, प्रदेशाध्यक्ष महेंद्र सावंग, प्रदेश सचिव देवचंद्र सम्दुर, भाई सिद्धार्थ पैठने, पं. परघरमोर, दिनेश एखारे, प्रकाश तायडे, आणि राजेश तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे माल्यार्पण करून आणि त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात आली. संघटनेच्या स्थापनेपासून एक वर्ष पूर्ण झालं असून, सध्या संघटनेच्या सभासदांची संख्या 300 हून अधिक आहे. दररोज नवीन सदस्य जोडले जात असल्याचे सांगण्यात आले.
दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “मूकनायक” या वर्तमानपत्राचा सन्मान आणि पत्रकार दिन साजरा करण्याबाबत एक निर्णय घेण्यात आलेला आहे. 31 जानेवारी 1920 रोजी सुरु झालेल्या “मूकनायक” वर्तमानपत्राचा सन्मान आणि मानवंदन म्हणून या दिवसाला ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

झालेल्या बैठकीत, केंद्रीय अध्यक्ष उत्तम वानखेडे आणि सचिव प्रकाश सरदार, तसेच राज्य अध्यक्ष महेंद्र सेवांग आणि राज्य सचिव देवचंद्र समदुर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सुजातदादा आंबेडकर आणि ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात येणार आहे.
याप्रकारे, या सोहळ्याद्वारे पत्रकारांच्या योगदानाचा सन्मान करण्यात येणार आहे, तसेच मूकनायक या ऐतिहासिक पत्राच्या महत्त्वावरही प्रकाश टाकला जाईल.
आढावा बैठकीत खालील पत्रकारांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे सूत्रसचालन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ पैठणे यांनी केले. त्याचप्रमाणे, केंद्रीय उपाध्यक्ष महादेव धवसे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश तायडे, राज्य उपाध्यक्ष राजेश तायडे, जळगांव जिल्हा अध्यक्ष दिनेश इखारे, रमेश खंडारे, राहुल इंगळे, रामेश्वर खरात, पंडित परघरमोर, मोनाली गणवीर, दिगंबर कंकाळ, राहुल सोनवणे, सुभाष वाकोडे, मुकेश हेलोडे, राहुल गवळी, अमोल अंबोरे, सागर शिरसागर, दिपक वाकोडे, पदमा मोहळ, विनोद गणवीर, विकास खरात, शितल शेगोकर, भिकाजी वाकोडे यांच्यासह अनेक पत्रकार या बैठकीला उपस्थित होते.
सर्व पत्रकारांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला आणि कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.





































