Homeआरोग्यशिक्षण संस्थेत नोकरी लावून देण्याच्या मोबदल्यात 2 लाखांची लाच स्वीकारतांना संस्थेचा सचिव...

शिक्षण संस्थेत नोकरी लावून देण्याच्या मोबदल्यात 2 लाखांची लाच स्वीकारतांना संस्थेचा सचिव ‘एसीबी’च्या जाळ्यात!

‘विनोद मधुकर चौधरी’ असे वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था पिंपरी खुर्द, तालुका धरणगाव येथील लाचखोर सचिवाचे नाव आहे.

वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था पिंपरी खुर्द, तालुका धरणगाव, जळगाव
पोलीस वार्ता, जळगाव | 10 लाख रुपयांची लाच मागणी करून 2 लाख रुपयांच्या पहिल्या हप्त्याची लाच स्वीकारताना जळगाव येथील शैक्षणिक संस्था सचिव ‘एसीबी’च्या जाळ्यात  सापडला. त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ‘विनोद मधुकर चौधरी’ असे वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था पिंपरी खुर्द, तालुका धरणगाव येथील लाचखोर सचिवाचे नाव आहे. या घटनेतील तक्रारदार एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा खुर्द येथील रहिवासी आहे. तक्रारदाराचा मुलगा वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था संचलित आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय भोद खुर्द या ठिकाणी सन 2021 पासून अनुसूचित जाती या प्रवर्गातील शिपाई रिक्त पदावर नोकरीस होता. तक्रारदाराचा मुलगा नोकरीस लागतांना ‘सचिव विनोद चौधरी’ याने त्यांच्याकडून 7 लाख 70 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर तक्रारदाराच्या शिपाई पदावरील मुलाचे वय कमी असल्याचे सांगून त्यास नोकरीवरुन गेल्या महिन्यात कमी केले होते. शिपाई पदाची जागा सन 2012 पासुन रिक्त पद दाखवून त्या जागेवर तक्रारदार यांच्या भाच्याला शिपाई पदावर नोकरी लावण्यासाठी, शासनाकडून मंजुरी आणून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी 10 लाख रुपयांची लाचेची मागणी सचिवाने केली.

लाचेच्या या रकमेचा 2 लाख रुपयांचा पहिला हप्ता 17 ऑक्टोबर रोजी सचिव विनोद चौधरी याने त्याच्या राहत्या घरी जळगाव येथे तक्रारदाराकडून स्विकारला. लाच स्विकारताच एसीबीच्या सापळा पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. सापळा पर्यवेक्षक अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो.ना.सुनील वानखेडे, पो.कॉ.प्रणेश ठाकूर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. त्यांना कारवाई मदत पथकातील सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोलिस नाईक बाळू मराठे, पोना किशोर महाजन, पोकॉ प्रदिप पोळ, पोकॉ राकेश दुसाने आदींचे सहकार्य लाभले.

पोलीस वार्ता, प्रतिनिधी: भास्कर जाधव,जळगाव

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात वाहनाच्या पीयूसी तपासणी दरात शासनाकडून वाढ, नवे दर जाहीर!

राज्यातील मोटार वाहनांच्या वायू प्रदूषण तपासणीच्या दरात सुधारणा करण्यास शासनाने मंजुरी दिली.. पोलीस वार्ता, नाशिक | महाराष्ट्र स्टेट पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशन, ठाणे यांनी वाहनांच्या...

भगूर शहर परिसरातील महावितरण संबंधी समस्या सोडवून नागरिकांना चांगल्या सेवा देऊ -सहा.अभियंता सुरेश पाचंगे

भगूर येथील तक्रार निवारण्यासाठी स्वतंत्र महिला कर्मचारी सारीका पोरजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. पोलीस वार्ता, देवळाली | पाऊस आणि येणाऱ्या आगामी सण व गणेशोत्सवाच्या...

राजापूर येथे ट्रान्सफॉर्मर फोडून 80 किलो वजनाच्या कॉपर कॉईलची चोरी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल!

चोरट्याने विद्युत पोलवरील 100 kv डीपीचा ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील 80 किलो वजनाची कॉपरची कॉईल चोरली.. पोलीस वार्ता, राजापूर | भोर तालुक्यातील राजापूर येथे शेतातील...

सहा पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल देवळाली कॅम्प येथे त्यांचा सत्कार!

पोलीस दलातील धाडसी व उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने 'राष्ट्रपती पदक' देऊन केले सन्मानित.. पोलीस वार्ता, देवळाली | महाराष्ट्र पोलीस दलातील नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा...

कावड़ यात्रा में ऊमडा जन सैलाब

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम पिपरी से खड़कोद तक निकली भव्य कावड़ यात्रा: गुप्तेश्वर महादेव मंदिर में पुजा-हवन के साथ संपन्न ​बुरहानपुर।...

error: Content is protected !!