राज्यातील मोटार वाहनांच्या वायू प्रदूषण तपासणीच्या दरात सुधारणा करण्यास शासनाने मंजुरी दिली..
पोलीस वार्ता, नाशिक | महाराष्ट्र स्टेट पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशन, ठाणे यांनी वाहनांच्या वायू प्रदूषण तपासणीचे दर वाढविण्याबाबत शासनाकडे मागणी केली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन विभागाने संबंधित बाबींचा विचार करून निर्णय घेण्याची कार्यवाही केली. त्यानुसार राज्यातील वाहनांच्या वायू प्रदूषण तपासणीच्या विद्यमान दरात सुधारणा करण्यात आली आहे.

राज्यातील मोटार वाहनांच्या वायू प्रदूषण तपासणीच्या दरात सुधारणा करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या सुधारित दरांची संबंधित वायू प्रदूषण तपासणी केंद्रांनी नोंद घेऊन त्यानुसार वाहनांची वायू प्रदूषण तपासणी शुल्क आकारणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.




































