Homeक्राईमदोन रायफल्ससह एकास अटक, एटिएसची मोठी कारवाई

दोन रायफल्ससह एकास अटक, एटिएसची मोठी कारवाई

भुसावळ – तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माणीच्या शस्त्रागारातुन दि १९ ते २०२४ ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सील व कुलूप व कडीकोयंडा तोडून शस्त्रागारातील तीन AK 47 रायफल्स व दोन गलील अशा 5 अत्याधुनिक रायफल्स चोरून पसार झााा होते.यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली होती.वरणगाव आयुध निर्माणीतील कडेकोट सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होते.याप्रकरणी भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशन येथे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेतील चोरीस गेलेली दोन रायफल्ससह एकास दि.४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान अटक करण्यात आली असून सदरील कारवाई एटीएस पथकाने केली.संशयित आरोपीचे लिलाधर उर्फ निलेश बळीराम थाटे असे नाव आहे.

दरम्यान जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते हे देखील या गंभीर घटनेची दखल घेऊन चौकशी करण्यासाठी काही दिवस तळ ठोकून होते. तसेच राज्याचे दहशतवादविरोधी पथक, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचे नेतृत्वाखालील गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रभारी अधिकारी व विविध तपास यंत्रणा देखील सतर्क झालेले होत्या. व समन्वयातून या चोरीच्या घटनेचा तपास सुरू करण्यात आलेला होता.काही दिवसांपूर्वी भुसावळ तालुक्यातील जाडगाव रेल्वे ट्रॅकवर तीन AK 47 रायफल्स मिळून आलेल्या होत्या. त्यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरवत रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या कुंडल्या काढून काल एकाला दोन रायफल्ससह अटक करण्यात आलेली आहे.
पोलीस रेकॉर्डवरील आरोपींची माहिती काढुन एटीएस पथकाने गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन, गुन्हा प्रकटीकरणाचे कौशल्य वापरून यातील आरोपी नामे लिलाधर उर्फ निलेश बळीराम थाटे, (वय ४३) रा.तळवेल ता. भुसावळ जि. जळगांव याचेकडे कसुन चौकशी केली असता सदर आरोपी याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. आयुध निर्माणी वरणगांव येथून चोरी केलेल्या AK 47 रायफल्स व गलील रायफल्स त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत.गुन्हयातील यापुर्वी बेवारस स्थितीत जाडगांव रेल्वे रूळावर मिळुन आलेल्या 3 रायफली ह्या देखील त्यानेच रेल्वे रूळावर टाकल्याचे कबूल केलेले आहे. गुन्ह्यातील आरोपी व गुन्हयात वापरलेली मोटर सायकल तसेच गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हे सहा.पोलीस निरीक्षक, वरणगांव पोलीस स्टेशन यांचेकडेस जमा केले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास जळगांव जिल्हा पोलीस करीत आहेत.

याप्रकरणी आयुध निर्माणीतील केंद्रीय सुरक्षा दलातील काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना असे एकूण सहा जणांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.मात्र प्रशासनाने बदनामी होण्याच्या अनुषंगाने निलंबित अधिकारी कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट गोपनीय ठेवलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!