ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.
पोलीस वार्ता, ठाणे : मध्य रेल्वेने दि.23 फेब्रुवारी 2025 रविवारी रोजी देखभाल व दुरुस्ती कामासाठी मध्य रेल्वे लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक ठेतला आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सायंकाळी 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
तसेच पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉगच्या वेळी लोकलच्या नियमित फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या उशिराने होतील.
मध्य रेल्वे
स्थानक : ठाणे ते कल्याण..
मार्ग : अप आणि डाउन जलद
वेळ : सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वा.
यादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल उशिराने धावतील.
हार्बर रेल्वे
स्थानक : ठाणे ते वाशी / नेरूळ
मार्ग : अप आणि डाउन
वेळ : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वा.
यादरम्यान ठाणे ते पनवेल / वाशी / नेरूळदरम्यान चालणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार असून हार्बर मार्गावर वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत.
पश्चिम रेल्वे
स्थानक : सांताक्रुझ ते गोरेगाव
मार्ग : अप आणि डाउन जलद
वेळ : सकाळी 10 ते दुपारी 3 वा.
यादरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या असून पश्चिम रेल्वेवरील काही लोकल फेऱ्यांसह हार्बर मार्गावरील काही लोकल फेऱ्याही रद्द असतील.
नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ही माहिती मध्य रेल्वे कडून प्रसारित करण्यात आली आहे. तरी प्रवाश्यांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...