Homeक्राईमभुसावळ बसस्थानकात मोबाईल चोरी करणारा तरुण रंगेहाथ पकडला ; दोन मोबाईल जप्त

भुसावळ बसस्थानकात मोबाईल चोरी करणारा तरुण रंगेहाथ पकडला ; दोन मोबाईल जप्त

भुसावळ –  बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या खिशातून मोबाईल चोरी करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी पाठलाग करून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना गुरुवारी दि.१२ रोजी सायंकाळी घडली. या कारवाईत सुमारे ४२ हजार ४११ रुपये किमतीचे दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश समाधान वराडे (वय ३१, रा. टाकळी खुर्द, ता. जामनेर) हे रेल्वेत ऑपरेटिंग विभागात नोकरीस असून ड्युटी संपवून सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता भुसावळ बसस्थानकात जामनेर बस पकडण्यासाठी आले होते.बसच्या दिशेने जात असताना एका तरुणाने त्यांच्या खिशातून मोटरोला कंपनीचा मोबाईल काढून पळ काढला.वराडे यांनी आरडाओरडा केल्यावर त्याच वेळी दुसऱ्या प्रवाशाचाही मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आले.नागरिकांनी तत्काळ पाठलाग करून संशयिताला पकडले व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

अंगझडतीत दोन मोबाईल हस्तगत…

पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचांच्या उपस्थितीत संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एकूण ४२ हजार ४११ रुपये किमतीचे दोन मोबाईल आढळून आले. यात मोटरोला कंपनीचा २४,४११ रुपये किमतीचा मोबाईल हा फिर्यादी योगेश वराडे यांचा असल्याचे त्यांनी ओळख पटवली. तसेच १८ हजार रुपये किमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल हा साईल सूर्यभान गायकवाड (वय १९, रा. करंजी, ता. बोदवड) यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
संशयिताची ओळख पटली पोलिसांनी पकडलेल्या संशयिताचे नाव तन्वीर उर्फ तन्या अब्दुल रहीम शेख (वय २२, रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव; सध्या मुक्काम शिवाजीनगर, भुसावळ) असे असून त्याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची तत्पर कारवाई…

पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल कांतीलाल केदारे, जावेद शहा, अमर अढाळे, दिलीप कोल्हे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. पंच म्हणून कलीम शेख व तेजस पाटील यांनी काम पाहिले. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनांविषयी नागरिकांमध्ये सतर्कता वाढली असून पोलिसांनीही प्रवाशांनी आपली मौल्यवान वस्तू सांभाळण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!