Homeआरोग्य'महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2025'; बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या वस्त्र उत्पादनांना प्रदर्शनात चांगली...

‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2025’; बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या वस्त्र उत्पादनांना प्रदर्शनात चांगली पसंती!

प्रदर्शनाला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लोकांनी येथे भेट दिली आहे..

पोलीस वार्ता, बारामती : मुंबईतील बीकेसी मैदान येथे आयोजित ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2025’ या कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते दि. 11 फेब्रुवारी रोजी झाला होता.

हा कार्यक्रम 23 फेब्रुवारी पर्यंत चालला, शहरी व ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या व्यवसाय-उत्पादनांना योग्य मार्गदर्शन, बाजारपेठ मिळवून देण्याच्या दिशेने हा सरकारचा प्रयत्न आहे. या प्रदर्शनाला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लोकांनी येथे भेट दिली आहे.

या प्रदर्शनात विविध व्यावसायिक महिलांनी, संस्थांनी, आपापल्या व्यवसायीक उत्पादनांचे स्टॉल लावले होते. त्यातच बारामती येथील ‘हाय-टेक टेक्सटाईल पार्क’ ने देखील यात सहभाग घेतला होता. या स्टॉलला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ‘हाय-टेक टेक्सटाईल’ पार्कच्या कार्यप्रणालीची आलेल्या महिलांनी माहिती घेत तयार उत्पादित वस्त्रमालाचे पाहून विशेष कौतुक केले.

पुण्यातील बारामती हे शेतीप्रधान केंद्र असेल तरी तेथे वस्त्र उद्योगाचा विकास देखील महत्वाचा आहे. टेक्सटाइल उद्योगाने स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना दिली असून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अनेक ब्रँड्सना प्रदर्शनात चांगली पसंती मिळाली, बारामतीमध्ये बऱ्याच टेक्सटाइल कंपन्या कार्यरत असून या कंपन्या कापड उत्पादन, रंगकाम, जाड कापड, आणि उच्च दर्जाच्या वस्त्र उत्पादक करून या क्षेत्रांमध्ये आघाडीवर उभरत आहे. यामध्ये स्थानिक कष्टकरी वर्गाला एक उत्तम रोजगार संधी उपलब्ध होत आहे. कामगारांचे जीवनमानात सुधारण्यास मदत मिळत आहेत.

‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2025’ विषेश बाब!

  • ग्रामीण भागातील महिला बचत गटांचे 500 पेक्षा जास्त स्टॉल्स, त्यातून हस्तकला वस्तू, वस्त्र उत्पादने आणि खाद्यपदार्थांची भव्य विक्री..
  • फक्त 13 दिवसात विक्रमी व्यवसाय; 27 कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल..
  • मुंबईकर व महाराष्ट्रातून आलेल्या प्रेक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद; महिला उद्योजकांच्या उत्पादनांना मोठी प्रमाणात मागणी..

शुद्ध कापड आणि इको-फ्रेंडली उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. हे उद्योग बारामतीच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण अंग ठरले. याचे श्रेय उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी सौ.सुनेत्रा अजित पवार यांना देण्यात यावे. तसेच मुसळे साहेब व बिपीन जगताप साहेब यांच्या प्रयत्नांमुळे प्रदर्शनात स्टॉल मिळवणे सोपे झाले. टेक्स्टाईल पार्क मधील सर्व व्यवस्थापकांचे सहकार्य मिळाले.

भविष्यातही अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांना विक्री व वितरणाच्या संधी उपलब्ध होऊन बाजार पेठा मिळण्यास मदत होईल.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: वर्षा चव्हाण, बारामती, संपर्क: 9763852891
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!