एका महिला प्रवाश्याचा, यशवंत व्यायाम शाळेजवळ रिक्षा आली असता रिक्षा थांबवुन रिक्षाचालकाने त्यांच्या सोबत अश्लिल कृत्य करून विनयभंग केला..
पोलीस वार्ता, नाशिक : शहरातील सिडको स्टेट बैंक चौक येथुन रिक्षात बसून मेनरोड नाशिककडे जात असतांना एका महिला प्रवाश्याचा, यशवंत व्यायाम शाळेजवळ रिक्षा आली असता रिक्षा थांबवुन रिक्षाचालकाने त्यांच्या सोबत अश्लिल कृत्य करून विनयभंग केला. ही घटना दि. 22 जून 2025 रोजी, रात्री 8.0 वाजेच्या सुमारास घडली. यासंदर्भात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्यादी महिलेच्या तक्रारीनंतर गुरनं 185/2025 भा.न्या.सं. कलम 74 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर अज्ञात रिक्षाचालकाचा शोध घेऊन या अतिशय गंभीर आणि संवेदशिल घटनेचा तपास करून कारवाई करण्याचे निर्देश नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदिप कर्णिक साहेब यांनी दिले.
नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे पथक या गुन्ह्याचा तपास करत असताना पोह. विशाल काठे व पोअं. मुक्तार शेख यांना गुप्त माहिती मिळाली की, हा गुन्हा रिक्षाचालक नासीर शेख याने केला असून तो भारतनगर, नाशिक या भागात फिरत आहे. ही माहीती त्वरित गुन्हेशाखा युनिटव-1 चे वपोनि. मधुकर कड यांना देवुन त्यांच्या मार्गदर्शनात सपोनि. हिरामण भोये, पोउनि. सुदाम सांगळे, पोह. विशाल काठे, प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे यांचे पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाला आरोपी रिक्षाचालक भारतनगर, नाशिक परिसरात शोधत असतांना तो दि.24 जून 2025 रोजी भारतनगर येथील दर्ग्याजवळ मिळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नाव विचारले, त्याने नासिर खलील शेख, (वय-25) रा. गल्ली नं-10, वडाळारोड, भारतनगर, नाशिक असे सांगितले. गुन्ह्यासंबंधी विचारले असता त्याने कबुली दिली आहे. त्यामुळे पुढील कारवाईसाठी आरोपीला सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके, नाशिक शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून मिळून करण्यात आली. पथकात रमेश कोळी, धनंजय शिंदे, गोरक्ष साबळे यांचा देखील समावेश होता.
✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...
रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे..
पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....
मृत्यू विषारी दारूमुळे झाला असताना संबंधित शासकीय यंत्रणांचे कुटुंबीयांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारण..
पोलीस वार्ता, पुणे : हडपसर परिसरात बनावट दारूमुळे मृत्यू झालेल्या मृत...