Homeक्राईमधावत्या ट्रेनमध्ये महिलेशी गैरवर्तन ; ऑन ड्युटी टी.सी वर गुन्हा दाखल

धावत्या ट्रेनमध्ये महिलेशी गैरवर्तन ; ऑन ड्युटी टी.सी वर गुन्हा दाखल

भुसावळ :- गोरखपूर ते “सर एम. विश्वेश्वरैया टर्मिनल, बेंगलुरु” (एस.एम.व्ही.टी) बंगळुरू स्पेशल ट्रेन (०६५३०) मधील ऑन ड्युटी टी.सी.प्रदीप कुमार तिवारी यांच्यावर महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी लोहमार्ग पोलीस स्टेशन, मनमाड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सध्या पुण्यात शिक्षण घेत असलेल्या कानपुर येथील तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ता.२२ मार्च रोजी कानपूरहून पुण्याला जाणाऱ्या ०६५३० एस.एम.व्ही.टी बंगळुरू स्पेशल ट्रेनमध्ये प्रवास करत होती.तिचे तिकीट आर.ए.सी असल्याने तिने टी.सी प्रदीप कुमार तिवारी यांच्याकडे सीट उपलब्धतेबाबत विचारणा केली.सुरुवातीला तिला बी -४ कोचमध्ये बसण्यास सांगण्यात आले,मात्र नंतर तिला ए-१ कोचमध्ये ५ नंबर सीट दिली.
तक्रारीनुसार,टी.सी प्रदीप कुमार तिवारी वारंवार तिच्या सीटवर येऊन बसले आणि तिला झोपण्यास सांगितले.काही वेळानंतर त्यांनी तिला अयोग्य प्रकारे स्पर्श केला.सुरुवातीला चुकून झाल्याचे समजून तिने दुर्लक्ष केले,मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा तिच्या जवळ येऊन बॅड टच केला.घाबरून ती वॉशरूममध्ये २०- २५ मिनिटे बसून राहिली.बाहेर आल्यानंतर तिला टी.सी प्रदीप कुमार तिवारी वॉशरूमच्या बाहेर उभे असलेले दिसले,यामुळे तिला भीती वाटली.
ही संपूर्ण घटना फिर्यादीने तिच्या वडिलांना फोनवर सांगितली.रेल्वे स्थानक भुसावळ येण्याच्या काही वेळ आधीपर्यंत टी.सी प्रदीप कुमार तिवारी यांनी तिचा पाठलाग करत राहून सतत गैरवर्तन केले.या प्रकरणी फिर्यादीने मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून,सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे.सदरील गुन्ह्यातील संशयित आरोपी टी. सी.प्रदीप कुमार तिवारी हे ता.२३ रोजी पुष्पक एक्सप्रेस ने आल्याची गोपनीय माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर घायरकर यांना मिळाली असती त्यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक किसन राख,पोलीस हवालदार जयकुमार कोळी,विलास जाधव,बाबू मिर्झा अशांना दालनात बोलावून कारवाई चे आदेश दिले. तात्काळ पथक मिळालेल्या माहितीच्या आधारे पोहचून सापळा रचून भुसावळ शहरातील तापी नगर भागातून मित्रांच्या घरून सायंकाळी सव्वा पाच वाजेला ताब्यात घेवून लोहमार्ग पोलीस ठाण्यात जमा केले.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि लोहामार्ग पोलिसांनी सतर्कता दाखवत पुढील कारवाई सुरू केली आहे.महिलांच्या सुरक्षेबाबत अशा घटना अत्यंत गंभीर असल्याने आरोपीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!