Homeउद्योगबारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार, माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा सत्तासंघर्ष!

बारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार, माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा सत्तासंघर्ष!

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील स्वत:चा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे..

पोलीस वार्ता, बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 22 जून 2025 रोजी होणाऱ्या निवडणुकीची सद्या राज्यभरात चर्चा चालू आहे. कारण या निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील स्वत:चा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बारामतीत लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार हा राजकीय संघर्ष दिसणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे युवानेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जाणार आहे.
तब्बल गेल्या 40 वर्षांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाग घेतला आहे. या निवडणुकीत ते थेट संचालकपदासाठी उमेदवारी करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात ‘श्री नीलकंठेश्वर पॅनेल’ ने 21 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’ चे 21 उमेदवार जाहीर केले आहे. त्यामुळे हा पुतण्या पवार विरुद्ध काका पवार संघर्ष रंगणार आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीत एकूण 6 गटातून 19,549 तर ‘ब’ वर्गातून 102 सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ‘ब’ गटातील मतदारांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. या मतदारांसाठी प्रशासकीय भवन येथेच मतदान केंद्र आहे.
माळेगावमध्ये गट सर्वाधिक 2965 मतदार आहेत, तर माळेगाव बुद्रुकमध्ये 1767, माळेगाव खुर्दमध्ये 580, येळेगावमध्ये 194, पाहुणेवाडीमध्ये 140, ढाकाळे येथे 284 मतदार आहेत. गट क्र. 2 पणदरेमध्ये 3796 मतदार आहेत. या गटात पणदरे, मानाप्पाचीवाडी, पवईमाळ, सोनकसवाडी, कुरणेवाडी, धुमाळवाडी, खामगळवाडी या गावांचा समावेश आहे.

सांगवी गटात 2487 मतदार असून सांगवीसह कांबळेश्वर, शिरने, पांढरेवाडी, पिंगळेवाडी ही गावे या गटात आहेत. गट क्रमांक 4 खांडज-शिरवलीत 2379 मतदार असून खांडज, शिरवली या दोनच गावांचा यात समावेश आहे. गट 5 निरावागजमध्ये 3506 मतदार असून निरावागज, मेखळी, सोनगाव, घाडगेवाडी ही गावे यात आहेत. सर्वाधिक मतदार बारामती गटात 4416 असून यात बारामतीसह मळद, मेडद, गुणवडी, डोरलेवाडी, राजाळे-सांगवी, वीरपुरी-दहिगाव, कऱ्हावागज, नेपतवळण, बऱ्हाणपूर, उंडवडी सुपे, उंडवडी क.प.जराडवाडी आणि सोनवडी या गावांचा यात समावेश आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी : वर्षा चव्हाण, बारामती, संपर्क: 9763852891
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!