Homeमहत्त्वाचेपत्रकार विठ्ठलराव महल्ले यांच्यावर हल्ल्याचा पातुर तालुक्यातील पत्रकार संघटनेकडून तीव्र निषेध

पत्रकार विठ्ठलराव महल्ले यांच्यावर हल्ल्याचा पातुर तालुक्यातील पत्रकार संघटनेकडून तीव्र निषेध

अकोला ( रमाकांत मोरे) येथील प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर विठ्ठलराव महल्ले यांच्यावर बुधवारी रात्री भ्याड हल्ला करण्यात आला. रात्री ११ वाजताच्या सुमारास ते आपले काम आटोपून घरी परतत असताना खदान परिसरात तीन अज्ञात आरोपींनी त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना अमानुष मारहाण केली. या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील पत्रकार व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असून, पोलीस प्रशासन गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे. विशेषतः पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या संख्येत वाढ होत असून, लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आला आहे. पातुर तालुक्यातील पत्रकारांचा निषेध व आंदोलनाचा इशारा दिला.

पातुर हल्ल्याच्या निषेधार्थ पातुर तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. हल्लेखोरांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

पातुर तहसील कार्यालयात झालेल्या या निषेध सभेमध्ये उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी व तहसीलदार डॉक्टर राहुल वानखडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर पत्रकार संघटनेचे प्रमुख सदस्य आणि तालुक्यातील अनेक मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

निवेदन देणाऱ्या पत्रकार शिष्टमंडळामध्ये देवानंद गहिले, निशांत गवई, गोपाल गाडगे, संजय गोतरकर, श्रीधर लाड, राजारामजी देवकर , रमेश देवकर, सय्यद हसनबाबु राजेश अवचार, गुलाबराव अंभोरे, छगन कराळे, डॉक्टर ममताताई इंगोले यांच्यासह पातुर तालुका व शहरातील प्रमुख पत्रकारांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

पत्रकार संरक्षणासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी पत्रकार महल्ले यांच्यावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण पत्रकार समुदायात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकार व पोलीस प्रशासनाने यापुढे पत्रकारांवरील हल्ले थांबवण्यासाठी विशेष धोरण आखावे, अशी मागणी पत्रकार संघटनेने केली आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास पातुर तालुक्यातील पत्रकार मोठे आंदोलन उभारतील, असा इशारा देण्यात आला आहे. पत्रकार हा समाजाच्या न्यायासाठी लढणारा योद्धा असतो. त्याच्यावर हल्ले होणे म्हणजे लोकशाहीला धोका निर्माण होणे होय. त्यामुळे सरकारने यावर गंभीर पावले उचलून पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!