पथकाने वालदेवी नदी पुल, विहीतगांव येथे सापळा लावून मिळालेल्या बातमी प्रमाणे हातात धारदार कोयता घेवुन फिरणाऱ्याला ताब्यात घेतले..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.श्री.संदिप कर्णिक साहेब यांनी शस्त्रे बाळगणाऱ्या व दहशत निर्माण करणाऱ्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार गुन्हेशाखा युनिट-2 कडून दि.27 मार्च 2025 रोजी विहीतगांव भागात प्रतिबंधात्मक गस्त घालत असताना सपोउनि प्रेमचंद गांगुर्डे यांना गोपनिय माहिती मिळाली की, नाशिकरोड येथील श्री.आण्णा गणपती मंदिराजवळ असलेल्या वालदेवी नदी पुलाजवळ एक इसम त्याच्या हातात कोयता घेवून येणारे-जाणारे लोकांवर कोयत्याचा धाक दाखवुन दहशत माजवत आहेत. सदरची ही बातमी सपोनि हेमंत तोडकर गुन्हेशाखा यांना देवून सपोउनि शंकर काळे, विलास गांगुर्डे, प्रेमचंद गांगुर्डे, पोह नितीन फुलमाळी यांच्या पथकाने वालदेवी नदी पुल, विहीतगांव येथे सापळा लावून मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री केली. व त्याठिकाणी एक इसम हातात धारदार कोयता घेवुन फिरतांना दिसून आल्याने त्याला जागीच पकडण्यात आले.




































