Homeताज्या बातम्यातहसीलदारांकडून पदांचा गैरवापर ; दंड न वसूलता सोडले जेसीबी

तहसीलदारांकडून पदांचा गैरवापर ; दंड न वसूलता सोडले जेसीबी

भुसावळ – येथील तहसीलदार नीता लबडे यांनी पदाचा गैरवापर करून पकडलेले जेसीबी कुठलाही कागदपत्र व दंड न करता सोडून दिले होते. याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिकचे प्रविण गेडाम यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जाची दखल घेत त्यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना याप्रकरणी शासन नियमातील तरतुदीनुसार चौकशी करून उचित कारवाईचे आदेश दिले आहेत.
याबाबत माहिती अशी की, वरणगाव परिसरात दि.14 जुलै 2025 रोजी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली होती. यात चार वाहने जप्त करण्यात आली होती. ही करवाई तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी रजनी तायडे यांच्या नेतृत्वात तलाठी सुप्रिया बिराजदार, रेणुका पाटील, नितीन केले, रोशन कापसे व जितेश चौधरी यांच्या संयुक्त सहभागाने पार पडली. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी इ. वाहने पोलिस बंदोबस्तात भुसावळ तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आली होती. त्यातील ट्रॅक्टर व डंपर यांनी दंड भरून सोडण्यात आले होते. व सदरील जेसीबी कुठलेही कागदपत्र न तपासता तसेच कुठलाही दंड न करता दि. 11 जुलै 2025च्या शासन निर्णया माहिती असतांना सुध्दा संबंधित तहसीलदार निता लबडे यांनी सोडून दिले. या संदर्भात सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी दि.15/9/2025 रोजी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. तसेच या तक्रार अर्जात तहसीलदार नीता लबडे यांची चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी देखील केली होती.

या तक्रार अर्जाची दखल घेत विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिकचे प्रविण गेडाम यांनी दि.30-9-2025 रोजी पत्र क्र. मशा-2/ कार्य/ गोख/ई टपाल नं.6846697/2025 अन्वये जिल्हाधिकारी जळगाव यांना सदर अर्जात नमुद केलेल्या बाबींच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करून शासन नियमातील तरतुदीनुसार अवश्यक ही उचित कारवाई करण्यात यावी व केलेल्या कारवाईबाबत अर्जदार यांना अवगत करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!