भुसावळ, ता.२६ शहरातील जामनेर रोडवरील यशवंत कॉलनी, नाहाटा कॉलेज समोर असलेल्या राहत्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख १२ हजार ६५३ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ता.१६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तोडून फिर्यादीच्या संमतीशिवाय अनधिकृतपणे घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील लॉकरमधील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
या प्रकरणी शोभा सुधाकर जयकारे यांनी ता.२५ एप्रिल रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


























