Homeक्राईमगावठी पिस्टलसह एक जेरबंद ; भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई

गावठी पिस्टलसह एक जेरबंद ; भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ – शहरातील शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडेपिर बाबा दर्गा परिसरात गावठी पिस्टल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणास भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या डी.बी. पथकाने जेरबंद केले.आरोपीकडून ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलिस अधीक्षक संदीप गावित तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांनी भुसावळ शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने कारवाई केली.
डी.बी. पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, कांतीलाल केदारे तसेच इतर कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती की, घोडेपिर बाबा दर्गा परिसरात एक तरुण गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा व जिवंत काडतूस घेऊन येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित अरसद अली शेख खालिद अली (वय २०, रा. आझाद नगर, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले.
त्याच्या अंगझडतीत ४० हजार रुपये किमतीचे मॅगझीनसह लोखंडी गावठी पिस्टल व एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. चौकशीत सदर कट्टा मोहम्मद राजीक मोहम्मद आरिफ (वय १९, रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ) याने ठेवण्यासाठी दिल्याची कबुली आरोपीने दिली.
याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३६/२०२६ अन्वये आर्म ॲक्ट कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

error: Content is protected !!