Homeउद्योगकार्ला गडावरील एकवीरा देवी यात्रा उत्सवाला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महामार्गावर टोल माफी...

कार्ला गडावरील एकवीरा देवी यात्रा उत्सवाला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महामार्गावर टोल माफी मिळावी!

श्री एकवीरा देवी कुलस्वामिनी असून, श्रद्धास्थानही आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महामार्गाची टोल माफी मिळावी..

पोलीस वार्ता, ठाणे : लोणावळ्याजवळील वेहेरगाव-कार्ला गडावरील एकवीरा देवी ही एक आदिशक्ती असून, आगरी-कोळी समाजासाठी एक जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकवीरा देवस्थानचा समावेश आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील पुणे-मुंबई या दोन महानगरांच्या मध्यभागी वेहेरगाव येथील कार्ला लेणी!

कार्ला गडावरील आई एकविरेची पालखी आणि तळी भरणे हा लाखो आगरी-कोळी बांधवांचा श्रद्धेचा सोहळा 3 ते 6 एप्रिल 2025 या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. रायगड, कल्याण, भिवंडी, ठाणे, पालघर, शहापूर आणि मुंबई अश्या परिसरातून लाखो भाविक या पवित्र सण यात्रेसाठी कार्ला गडावर येणार आहेत. महाराष्ट्रातील विशेषत: मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकवीरा देवी कुलस्वामिनी असून, श्रद्धास्थानही आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महामार्गाची टोल माफी मिळावी, यासाठी कल्याण शिवसेना उपशहरप्रमुख विजय देशेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे(बाळ्या मामा), कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांना निवेदन दिले आहे.

पुणे-मुंबई या दोन महानगरांच्या मध्यभागी विपुल निसर्गसंपदा, प्राचीन व ऐतिहासिक लेण्या व गड-किल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी कार्ला लेणी व श्री एकवीरा मातेचे मंदिर आहे.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे, संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणूक 2026 साठी 26 एप्रिल रोजी होणार मतदान!

नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय करणारे (R.M.P.) आणि मतदार यादीत नावे असलेले मतदार मतदानास पात्र राहतील.. पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (Maharashtra medical council) मुंबई...

रावेर स्टेशन पर पुणे-जबलपुर एक्सप्रेस के ठहराव की मांग

0
हजारों यात्रियों की सुविधा के लिए रेलमंत्री को सौंपा गया निवेदन रावेर (जिला जळगांव) – पुणे-जबलपुर एक्सप्रेस (20161/20162) को रावेर रेलवे स्टेशन पर ठहराव देने...

अन अकैडमी सेंटर, बुरहानपुर द्वारा शैक्षणिक पहल एवं आगामी कार्यक्रमों की घोषणा

0
बुरहानपुर। संस्कार होटल, लालबाग, स्टेशन रोड पर आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में अनअकैडमी सेंटर, बुरहानपुर के डायरेक्टर श्री रत्नेश पाटीदार जी* ने मीडिया प्रतिनिधियों को...

माध्यमांनी महिलांविषयी वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी!

महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या ‘इनडिसेंट रिप्रेजेंटेशन ऑफ वूमन’ कायद्याचे वारंवार उल्लंघन.. पोलीस वार्ता, मुंबई : वृत्त माध्यमांनी महिलांविषयीचे वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी,...

₹२८१ कोटींच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी; ३७५६ हेक्टर क्षेत्राला दिलासा

0
भुसावळ : पाठपुराव्याला अखेर भरीव यश मिळत कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेच्या क्र. १ व क्र. २ या महत्त्वपूर्ण योजनांना राज्य शासनाकडून सुमारे ₹२८१...

error: Content is protected !!