Homeराजकीयभुसावळ नगरपरिषद निवडणूक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर ‘एबी फॉर्म’...

भुसावळ नगरपरिषद निवडणूक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर ‘एबी फॉर्म’ साठी १० लाख रुपये मागितल्याचा शिवसैनिकाचा गंभीर आरोप

भुसावळ, दि. २२ नोव्हेंबर २०२५, भुसावळ नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शर्मा यांच्यावर पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी आवश्यक असलेला ‘एबी फॉर्म’ देण्यासाठी जेष्ठ शिवसैनिक असलेल्या उमेदवाराकडून थेट १० लाख रुपये मागितल्याचा गंभीर आरोप आणि पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

भुसावळ येथील जेष्ठ शिवसैनिक आणि निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवार शरद गुलाबचंद जैस्वाल व त्यांची पत्नी सौ. कविता शरद जैस्वाल यांनी शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात हा आरोप केला आहे.
दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी नगरपरिषद निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शरद जैस्वाल यांनी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शर्मा यांच्याशी भेटून आणि संपर्क साधला असता, शर्मा यांनी “उद्या (१७ तारखेला) एबी फॉर्म मिळतील” असे सांगितले.

दरम्यान,दि. १७ नोव्हेंबर रोजी पुन्हा फोन केला असता शर्मा यांनी फोन उचलला नाही.त्यानंतर पक्षाचे संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना मेसेज केला,परंतु त्यांच्याकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वी झालेल्या वैयक्तिक भेटीत चंद्रकांत शर्मा यांनी थेट सांगितले की, “जैस्वालजी, तुम्ही १० लाख रुपये देऊ शकत असाल तरच तुम्हाला एबी फॉर्म मिळेल. जे उमेदवार पैसे देतील, त्यांनाच फॉर्म मिळेल.” ऑनलाइन नामनिर्देशन पत्र दाखल करूनही शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म न मिळाल्याने जैस्वाल दाम्पत्याला अपक्ष म्हणून अर्ज दाखल करावा लागला आणि परिणामी त्यांचे दोन्ही अर्ज अवैध ठरले.

जैस्वाल यांनी पत्रात म्हटलेलं आहे की, “जिल्हा प्रमुखांनी पैशाची मागणी केल्यामुळेच शेवटच्या दिवशी पक्षाच्या कार्यकर्त्यांना एबी फॉर्म मिळाले नाहीत आणि अनेक जण अपक्ष उमेदवार म्हणून उतरले तर काही जण निवडणूकी पासून वंचित राहिल्याने त्यांचा विश्वासघात झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.”

दरम्यान, या प्रकरणामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जळगाव जिल्ह्यातील भुसावळ मधील अंतर्गत राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.पक्षांतर्गत पैशांचा व्यवहार आणि उमेदवारी वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा हा पहिलाच थेट लेखी पुरावा समोर आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!