आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईकें हे आपल्या दौऱ्यासाठी जळगाव-धरणगाव तालुका येथे आले असता आश्रमशाळा कर्मचारी संघटनेकडून त्यांना निवेदन..
पोलीस वार्ता, जळगाव : महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या मंत्रिमंडळाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे खाते वाटप महायुती सरकारकडून नुकतेच जाहीर झाले. त्यातील आदिवासी विकास विभाग मंत्री म्हणून डॉ.अशोक उईकें यांची नियुक्ती झाली आहे. आज आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईकें हे आपल्या पहिला दौऱ्यासाठी जळगाव-धरणगाव तालुका येथे आले.
यावेळी शासनमान्य आदिवासी विकास विभाग आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष तथा राज्य कार्यकारीनी सदस्य मनोज ठाकरे यांनी मंत्र्यांना आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच आपण सभागृहात आश्रमशाळेच्या वेळेबाबत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक लक्षवेधी मांडली त्या बद्दल आभार व्यक्त केले.
निवेदनात म्हटले आहे, कर्मचाऱ्यांच्या इतर प्रश्नासंदर्भात प्रामुख्याने आश्रमशाळेची वेळ पूर्ववत 11 ते 5 करणे व 2005 नंतर नियुक्त तसेच दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि इतर प्रश्नांसाठी, लेखी निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित दिले.
सदर निवेदनाबाबत आपण मंत्री म्हणून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिले. याकामी राज्य कार्यकारिणी सदस्य सी.डी.पाटील, धरणगाव तालुका अध्यक्ष योगेश पाटील, नितीन पाटील, सागर पवार व व्ही.आर.पाटील यांनी उपस्थित राहून काम पाहिले.
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...