भुसावळ – शहरातील पंचशील नगर भागातील केळी विकणारे चाळीस वर्षीय इसमाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना ता.१८ रोजी घडली. अमीन नूर मोहम्मद बागवान असे संशयितांचे नाव आहे.
पीडित चिमुकलीची आई घरात काम करीत असतांना पंचशील नगर मधील रहिवाशी अमीन बागवान हा दुपारी दीड वाजेच्या सुमारास केळीचे परात (ताट) घेवून घरासमोर आला. त्यावेळी चिमुकली बाहेर केळी घेण्यासाठी गेली असे आईला वाटले.मात्र काही वेळेनंतर चिमुकली रडत – रडत घराजवळ आली आईने रडण्याचे कारण विचारले असता केळी विकणारे अंकल यांनी सार्वजनिक शौचालयाकडे नेवून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणून पीडित चिमुकलीची आईने दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोउपनिरी.मंगेश जाधव करीत आहे.


























