गुन्हेशाखा युनिट-2 कडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले असून दुचाकी जप्त केली आहे..
पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरात घडणाऱ्या दुचाकी व इतर चोरीच्या घटना, घरफोड्या आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस प्रशासनाला दिले आहे.
त्यानुसार नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-2 चे पथक दुचाकी चोरीच्या गून्ह्यातील आरोपींचा परीसरात शोध घेत असताना दि.17 एप्रिल 2025 रोजी सपोउनि. प्रेमचंद गांगुर्डे व पोह. चंद्रकांत गवळी यांना गुप्त माहीती मिळाली की, एक संशयित चोरीची बजाज पल्सर मोटार सायकल(दुचाकी) विक्री करण्याकरीता कवटेकरवाडी समोर नाशिक येथे येणार आहे, सदर बातमी शहर गुन्हेशाखा युनिट-2 सपोनि. हेमंत तोडकर यांना देवून त्यांच्या मार्गदर्शनाने पोलीस पथक तयार करून सपोउनि. प्रेमचंद गांगुर्डे, पोह. संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, परमेश्वर दराडे व इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बिट मार्शलचे पोअंम. मंगेश आव्हाड व सोबतचे होमगार्ड सागर काळे यांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशीत केले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे कवटेकरवाडी, पांडवलेणी, नाशिक येथे सायं 6.45 वाजताचे सुमारास गुन्हेशाखा पथकाने सापळा लावला त्यावेळी एक संशयित बजाज पल्सर मोटार सायकलवर बसलेला दिसून येताच पथकाने जागीच छापा टाकून त्याला पकडले, त्याचे नाव विचारले असता त्याने नितीन एकनाथ पवार (वय-20) रा. लोकमत समोर, कवटेकरवाडी, पांडवलेणी आणि मुळ रा. काळमाथा, खेडलेझुंगे, ता.निफाड, जि.नाशिक असे सांगितले. त्याच्या ताब्यातून 25,000/- रू किंमतीची बजाज पल्सर मोटार सायकल, एमएच 15 ईएन 6476 ही जप्त करण्यात आली आहे. आरोपीने दिलेल्या कबुली वरून शहरातील इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुरनं. 118/2025 भा.न्या.सं 2023 कमल 303(2) प्रमाणे दाखल पूर्वीचा गुन्हा उघडकीस आला आहे. जप्त मुद्देमालासह आरोपीस पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. इंदिरानगर पोलीस ठाणे वपोनि. तृप्ती सोनवणे मॅडम आणि पथकातील पोउनि. यशवंत बेंडकोळी, प्रकाश महाजन, पोअंम. प्रविण वानखेडे, चापोअंम. सुनिल खैरनार यांचा देखील पथकातील कारवाईत समावेश होता.
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...
रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे..
पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....