कंपनीतून येणाऱ्या कोळशाच्या धूलिकणमुळे मोठ्या प्रमाणात परिसरात प्रदूषण बघायला मिळते, कंपनीतील जड मालवाहू ट्रक सर्रास रोडवर उभ्या केल्या जातात..
पोलीस वार्ता, वणी : यवतमाळ-वणी मार्गावर असलेल्या निंबाळा या गावाजवळ ‘रुखमाई कोल वाशेरीइस्’ ही कंपनी असून कंपनीमधून कोळसा वाश करून विद्युत निर्मितीसाठी पॉवर प्लांट मध्ये पाठवला जातो. या कंपनीत कामगारांची भरती ही चालूच असते परंतु कंपनी व्यवस्थापक स्थानिक लोकांना रोजगार न देता, इतर ठिकाणावरील कामगारांना काम देतात. कंपनीचा स्थानिक रोजगार डावलण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसून येतो. यावर शासनाने लक्ष देऊन स्थानिकांना न्याय द्यावा.
‘रुखमाई कोल वाशेरीइस्’ ही कंपनी वणीत स्थायिक असून कंपनीमुळे होणाऱ्या त्रासाला स्थानिक लोकच तोंड देत आहेत. कंपनीतून येणाऱ्या कोळशाच्या धूलिकणमुळे मोठ्या प्रमाणात परिसरात प्रदूषण बघायला मिळते, कंपनीत येणाऱ्या-जाणाऱ्या जड मालवाहू ट्रक सर्रास रोडवर उभ्या केल्या जातात. यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन स्थानिकांना प्रवासाचा अडथळा व छोट्या-मोठ्या अपघातांचा सामना करावा लागत आहे. यासर्व समस्यांना लक्षात घेऊन शिवसेना शिंदे गटाकडून दि. 8 एप्रिल रोजी माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात वणी येथे रस्तारोको धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.





























