मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चित्रे कलाकाराच्या कलाकृतींचे पाहणी करून कलाकारांना स्वतः स्वाक्षरी करून सन्मानपत्र दिल्याने सर्व कलाकार भारावून गेले..
पोलीस वार्ता, बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवारांच्या हस्ते बारामतीत चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ‘नटराज नाट्य कला मंदिर’ यांच्या माध्यमातून कलाकारांच्या कलाकृतींना व्यासपीठ मिळावे यासाठी या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चित्रे कलाकाराच्या कलाकृतींचे पाहणी करून कलाकारांना स्वतः स्वाक्षरी करून सन्मानपत्र दिल्याने सर्व कलाकार भारावून गेले होते. या प्रदर्शनात बारामतीतील कलाशिक्षक आणि विविध हौशी कलाकारांनी रेखाटलेली 90 आकर्षक चित्रे ठेवली आहेत.
कलाशिक्षक अतुल गायकवाड व व्यंगचित्रकार शिवाजी गावडे यांनी अजित पवारांचे काही क्षणात रेखाटलेले चित्र पाहून अजित पवारांनी दोघांचेही कौतुक केले. ‘नटराज नाट्य कला मंदिर’च्या माध्यमातून बारामतीतील कलाकारांना कलाकारकट्टा नावाचे मोफत व्यासपीठ जेष्ठ नगरसेवक मा.किरण गुजर यांनी उपलब्ध करून दिले आहे. कलाकारांना विविध सुविधाही या माध्यमातून पुरवल्या जातात. या कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांचे स्वागत मनोज कुंभार यांनी केले. तसेच भारत काळे यांनी आयोजित प्रदर्शना विषयी माहिती सर्वांना दिली.
बारामतीत आयोजित केलेले हे चित्रप्रदर्शन प्रदर्शन दि.6 एप्रिल 2025 ते 9 एप्रिल 2025 पर्यंत, सकाळी 10-1 आणि सायंकाळी 4-8 वाजेपर्यंत ‘नटराज नाट्य कला मंदिर’ येथे सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले असणार आहे. बारामतीकरांना या प्रदर्शन पाहिला मिळावे. यासाठी नटराज नाट्य कलामंदिरच्या सर्व सदस्य आणि कलाकारांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला आहे.
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता
( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास
खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...