बामणोद ( आर.के.इंगळे ) ता. यावल येथिल युवराज महादेव सपकाळे यांची घरासमोर उभी ॲसलेली बजाज कंपनीची पल्सर गाडी क्र. MH 12 JT 1517 हि मोटर सायकल दि. 27-5-2025 रोजी रात्री 1.30 ते 1.45 वाजे दरम्यान अज्ञात व्यक्तिने पेटवून दिली.
सदर मोटर सायकल ही बामणोद येथील डेली मार्केट या मेन रोड वर उभी केलेली होती या परीसरात बामणोद ग्रामपंचायत तर्फे हजारो रुपये खर्च करुन सी.सी.टिव्हि कॅमेरे बसविण्यात आले आहे सदर घटना कॅमेरात बघण्यास गेले असता कॅमेरे बंद आढळून आले गेल्या वर्षभरापासून केमेरात काहीही रेकॉर्डिंग नसल्याचे आढळून आले सदर मोटर सायकलचे पंचविस ते तिस हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे युवराज सपकाळे यांनी सांगितले.सदरील रोड हा मेन राग असुन या परीसरातिल केमेरे ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी बामणोद वासियांनकडून होत आहे




































