Homeउद्योगनाशिकमधील इंदिरानगर पेरूचीबाग येथील जुगार अड्ड्यावर छापा; रोख रक्कमेसह साहित्य आणि दुचाकी,...

नाशिकमधील इंदिरानगर पेरूचीबाग येथील जुगार अड्ड्यावर छापा; रोख रक्कमेसह साहित्य आणि दुचाकी, चारचाकी वाहने जप्त!

पाथर्डी गांव शिवारातील फ्लाईंग कलर्स स्कुल समोर असलेल्या शेतामधील पत्राच्या शेडमध्ये जुगार अड्डा चालू होता..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील अवैध धंद्यांवर तसेच जुगार अड्डड्यांवर कारवाई आणि चोरीच्या घटना, वाढती गुन्हेगारी यावर कारवाई करण्याबाबत सुचना नाशिक शहर आयुक्त मा.संदीप कर्णिक साहेब यांनी दिले आहेत.
त्यानुसार नाशिक शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 चे पथक हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना दि.23 एप्रिल 2025 रोजी पोह. नंदकुमार नांदुर्डीकर यांना गुप्त माहिती मिळाली की, पाथर्डी गांव शिवारातील फ्लाईंग कलर्स स्कुल समोर असलेल्या शेतामधील पत्राच्या शेडमध्ये काही लोक तीनपत्ती नावाचा जुगार खेळत व खेळवीत आहेत. सदर माहिती मिळताच ती शहर गुन्हेशाखा युनिट-2 सपोनि. हेमंत तोडकर यांना देवून त्यांच्या मार्गदर्शनाने पोलीस पथक तयार करून सहा. पोनि. डॉ.समाधान हिरे, श्रेणी. पोउनि मुक्तारखान पठाण, सपोउनि शंकर काळे, गुलाब सोनार, विलास गांगुर्डे, सुनिल आहेर, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, नितीन फुलमाळी, अतुल पाटील, पोअंम. जितेंद वजीरे यांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशीत केले.

मिळालेल्या माहीतीच्या आधारे पाथर्डीगांव शिवारातील फ्लाईंग कलर्स स्कुल समोर असलेल्या ठिकाणी शेडमध्ये सायं 7:40 वाजता पोलीस गुन्हेशाखा पथकाने छापा टाकला यावेळी विनापरवाना बेकायदेशीररित्या जुगाराचा अडडा सुरू असल्याचे समोर आले. आरोपी 1)वसीम अन्वर शेख (वय 41), रा. पळसेगांव, ता.जि. नाशिक व समीर पठाण रा. वडाळागांव नाशिक हे दोघे मिळून हा जुगाराचा अड्डा चालवत होते. जुगारासाठी टेबल खुर्च्छा, पत्ते, एअर कुलर व इतर सुविधा उपलब्ध केलेल्या होत्या.

  • जुगार खेळविण्याचे काम करणारे..

1) विशाल प्रल्हाद आहिरे (वय 44) रा. गांधी पुतळा देवळाली गांव, नाशिक
2) फारूक गुलाब शेख (वय 49) रा. संगमनेर, जि. आहिल्यानगर
3) अजय राजु पडघान (वय 29) रा. जाधव संकुल अंबडलिंकरोड, नाशिक
4) दिपक रामतेज मोर्या (वय 34) रा. जाधव संकुल अंबडलिंकरोड, नाशिक
5) गणेश भास्कर खैरे (वय 44), रा. नांदुर्डी, ता.निफाड, जि. नाशिक
या जुगाराच्या अड्ड्यावरील 6 कामगारासह जुगार खेळणारे पुढील..

  • जुगार खेळण्यासाठी आलेले..

7) सुनिल सदाशिव जाधव (वय 41) रा. मुळेगांव, ता. त्रंबकेश्वर जि.नाशिक
8) भुषन सदाशिव केंदळे (वय 33) रा. राजराजेश्वरी, नाशिकरोड, नाशिक
9) अनिल देवराम खरात (वय 47) रा. ब्राम्हणगांव, ता. निफाड, जि. नाशिक
10) भाऊराव मल्हारी धनगर (वय 42) रा. हरसुल ता. त्रंबकेश्वर जि.नाशिक
11) शेखलाल शेखनुर शेख (वय 54) रा. इस्लामपुरा, पिंपळगांव बसवंत, ता.निफाड, जि. नाशिक
12) जावेद रज्जाक शेख (वय 40) रा. खडकाळी, भद्रकाली, नाशिक
13) सागर प्रल्हाद बुलाखे (वय 39) रा. दे.कॅम्प, नाशिक.
असे वरिल सर्व तीनपत्ती हा जुगार खेळतांना आढळून आले, सर्व आरोपींकडून जुगाराचे साधने-साहीत्य तसेच रोख रक्कमसह 5 चारचाकी वाहने, 1 रिक्षा, 15 दुचाकी, आणि मोबाईल असा एकुण 60,90,620/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार अड्यासाठी जागा उपलब्ध करून देणारा जागा मालक आणि वाहन सोडून पळून गेलेले लोक व जुगार अड्यात भागीदारी असलेला समीर पठाण असे एकूण 29 आरोपींच्या विरोधात शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्यात, मुंबई जुगार कायदा कलम-4 व 5 प्रमाणे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. पथकात पोअं. प्रविण वानखेडे यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!