Homeसामाजिकधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त  विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त  विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

भोर प्रतिनिधी :- राम पाचकाळे ।  दि. १४ मे २०२६ रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भोर तालुक्यातील न्हावी १५ येथे आयोजित करण्यात आलेले १०० वे विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला वर्ग, युवक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश तनपुरे यांनी प्रभावीपणे केले. हिंदू समाज एकत्र येणे, कुटुंब प्रबोधन तसेच हिंदू संस्कृतीचे जतन व संवर्धन याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर विराट हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून न्हावी १५ येथे हा भव्य कार्यक्रम पार पडला.
या संमेलनाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. प्रवीण दबडघाव (प्रांत कार्यवाह, पश्चिम महाराष्ट्र), मातृशक्ती प्रबोधनकर्त्या किशोरीताई पवार (लेखिका व कवयित्री) उपस्थित होत्या. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून ह.भ.प. राहुल महाराज पारठे (महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार प्राप्त, झी टॉकीज ‘प्रेम युवा’ कीर्तनकार) यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.

यावेळी भालचंद्र जगताप, बाळासाहेब गरुड, रोहन बाठे, संतोष मोहिते, सोमनाथ सोमानी, आप्पा चव्हाण, संतोष धावले, विश्वास ननावरे, डॉ. चोबे, ॲड. मंगेश आंबुले, अशोक चव्हाण, अंकुश हिंगे, मेघराज सोनवणे, राजेंद्र निगडे, भरत सोनवणे, विजय गरुड, विकास चव्हाण, अर्जुन बोबडे, रामदास गाडे, पांडुरंग निगडे, निलेश सोनवणे यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला वर्ग, सोसायटी सदस्य, चेअरमन आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात न्हावी १५, भोंगवली, हिंगे वाठार परिसरातील इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, महिला वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या शेवटी पसायदानाने वातावरण भक्तिमय झाले आणि मोठ्या उत्साहात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डंपरच्या चाकाखाली चिरडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील सुनसगाव येथे सुदर्शन पेपर अँड प्रॉडक्ट्ससमोर रेतीने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी पहाटे...

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

error: Content is protected !!