घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून १ लाख ४६ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले..
पोलीस वार्ता, भुसावळ, : पंचशील नगर परिसरातील घरफोडी प्रकरणाचा भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून एकूण २ लाख ४९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचशील नगर येथील रहिवासी शुभम विनायक जामनकर (वय ३२) हे १८ मे ते ७ जून २०२६ दरम्यान बाहेरगावी गेले होते. या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून १ लाख ४६ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(१), (३) व (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.


























