रावेर (प्रतिनिधी) – पोलीस विभागात राहून जिवाची पर्वा न करता अनेक गुन्ह्यांचा बारकाईने तपास करून गुन्हेगारांना कायद्याचा धाक निर्माण करणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज पाटील यांचा पोलीस महासंचालक पदकाने गौरविण्यात आले होते.अशा कर्तव्यदक्ष कर्तबगार पोलीस हे. कॉ सुरज मधुकर पाटील यांचा विवरे बु ॥ येथे डॉ. उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार नंदकिशोर महाजन, आमदार अमोल जावळे यांचे प्रमुख उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात आला.
विवरे बु॥ येथे महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर महाजन, कर्तबगार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज पाटील ( डिवायएसपी कार्यालय भुसावळ व कीर्तीवंत मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वासुदेव नरवाडे मित्र परिवार, ग्रामस्थां तर्फे भव्य सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन मान्यवरांचे हस्ते प्रारंभ करण्यात आला. विधान परिषदेचे आ. नंदकिशोर महाजन,विधानसभेचे आ.अमोल जावळे, मा.खा.डॉ उल्हास पाटील, शेती पाणंद रस्ते सुधार समितीचे सह अध्यक्ष सुरेश धनके, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, बाजार समिती सभापती प्रल्हाद पाटील, पणन महामंडळाचे अध्यक्ष रोहीत निकम यांचे बंधू रितेश निकम, जिल्हा शिक्षक पतपेढी अध्यक्ष प्रा. शैलेश राणे, पोलीस निरीक्षक संदीप पाटील ( रावेर ) डॉ संदीप पाटील, सपोनि मीरा देशमुख (निंभोरा), पिक संरक्षण सो. चेअरमन गिरीश बेंडाळे,दुध उत्पादक संस्था संचालक दिलीप लढे, विकोसो चेअरमन गोपाळ राणे,व्हा.चेअरमन विलास सपकाळ, प्रगतशिल शेतकरी रफिक शेठ, प्रोजेक्ट मॅनेजर विवेक चंद्रकांत पाटील (विप्रो कंपनी बंगलोर ) विकासो व्हा.चेअरमन किरण पासपांडे, सौ नीलिमा नेमाडे, कु. हेमाक्षी राणे व दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार मा.सरपंच वासुदेव नरवाडे, बेंडाळे हायस्कूल व्हा.चेअरमन रामचंद्र पाटील, योगेश पाटील, पोलीस पाटिल योगेश महाजन, सुनील पाटील, दीपक रमेश राणे,भानुदास महाजन, गणेश धनोळे, सागर चौधरी, युवराज जुनघरे, प्रशांत नरवाडे, विजय नरवाडे, केशव राणे,दिलीप राणे, हर्षाली बेंडाळे, मनीषा पाचपांडे, आशा नरवाडे, यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी राजन लासुरकर, पि के महाजन, विजय महाजन, हरलाल कोळी, दुर्गेश पाटील, महेश चौधरी, उमेश महाजन, भूषण चौधरी, मुख्याध्यापक पी एच वायकोळे, पर्यवेक्षक रविंद्र कोल्हे, कैलास राणे,देवेंद्र राणे, सौ पुनम राणे, सौ तेजल बोरोले, जगदीश पाटील, योगिता वानखेडे, श्रीमती विद्या राणे, अभिजीत सनंसे, विपिन राणे, साहेबराव चौधरी, राजेंद्र विश्वनाथ राणे, गिरीश राणे, प्रकाश नरवाडे, बिसन सपकाळे, किशोर महाजन, पंकज सपकाळ, रूपेश पारसकर, राहूल पारसकर, ठेकेदार सतीश पाटील,आरिफ मिस्तरी, समदखा मिस्त्री, शकील शेख शफी, शे आरिफ यांचे सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक वासुदेव नरवाडे यांनी केले. सत्कार सोहळा कार्यक्रम प्रसंगी पद्माकर महाजन, सुरेशभाऊ धनके, आ.अमोल जावळे,आ. नंदकिशोर महाजन, यांनी मनोगत व्यक्त केले. तर डॉ. उल्हास पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत करून सत्कार मूर्तींचा गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. निलिमा नेमाडे यांनी तर आभार वासुदेव नरवाडे यांनी मानले.



































