Homeउद्योगकामटवाडे येथील खुनाच्या प्रकरणातील आरोपींना शहर गुन्हे शाखा युनिट-1 कडून अटक

कामटवाडे येथील खुनाच्या प्रकरणातील आरोपींना शहर गुन्हे शाखा युनिट-1 कडून अटक

काही दिवसांपूर्वी झालेल्या खुनाच्या घटनेतून पुन्हा एकदा टोळी वर्चस्व वादात कामटवाडे येथे एकाचा दगडाने ठेचून खुन..

पोलीस वार्ता, नाशिक : शहरात दिवसाआड घडणाऱ्या खून्हाच्या घटना आणि इतर गुन्हे यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे आणि गुन्हेगारांना पकडणे हे पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान बनले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या खुनाच्या घटनेतून पुन्हा एकदा आज दि.29 एप्रिल रोजी टोळी वर्चस्व वादात कामटवाडे येथे एकाचा दगडाने ठेचून खुन करण्यात आला आहे. यासंबंधी गुन्हा दाखल होताच, आरोपींना पकडून कारवाई करण्याबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.श्री.संदीप कर्णिक साहेब यांनी आदेश दिले होते.
त्याप्रमाणे नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 कडून आरोपींचा शोध घेत असतांना दि.28 एप्रिल 2025 रोजी पोह. विशाल काठे व प्रशांत मरकड यांना गुप्त माहिती मिळाली की, खुणाच्या गुन्ह्यातील आरोपी हे आसाराम बापु पुल, गंगापुर, या ठिकाणी थांबलेले आहेत. सदर माहिती मिळताच ती मा.वपोनि मधुकर कड यांना देवून त्यांच्या आदेशान्वये पोउनि. चेतन श्रीवंत, पोउनि. सुदाम सांगळे, पोह. प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, प्रशांत मरकड, विशाल काठे, नाझीमखान पठाण, योगीराज गायकवाड, पोना. विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, पोअं. मुक्तार शेख, अमोल कोष्टी, पोह. सुकाम पवार यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहितीनुसार आसाराम बापु पुल, गंगापुर, नाशिक येथे जाऊन परिसरात आरोपींचा शोध घेत असताना काही संशयित पोलीसांची गाडी पाहून पळतांना दिसुन आले.

त्यांना सव्वा सात वाजेच्या दरम्यान ताब्यात घेवुन त्यांचे नाव गाव यांची चौकशी केली असता नावे 1)मोहन ज्ञानेश्वर वायचळे (वय-18) रा. कामगार नगर, तिरंगा चौक, सातपुर 2)राहुल राजु गडदे (वय-20) रा. आनंदवल्ली, रिक्षा स्टेंड जवळ, मुळ गाव- नांदुर कोंडार, ता.नांदगाव जि.नाशिक 3)साहिल पिंटु जाधव (वय-21) रा. आनंदवली, माळी वाडा, गंगापुर रोड व इतर दोन विधीसंघर्षीत बालक असे एकूण पाच आरोपींना गुन्हेशाखेच्या पथकाने ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हाची विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याच्या सांगण्यावरून गुन्हा केला असल्याची कबुली दिली. आरोपींना पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून करण्यात आली. पथकात सपोनि. हिरामण भोये, रोहिदास लिलके, राम बर्डे, पोअं.अनुजा येलवे, पोअं. समाधान पवार यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

error: Content is protected !!