Homeक्राईमशासन सेवक प्रकरण ; तिघांची सब जेल रवानगी - दोन फरार !

शासन सेवक प्रकरण ; तिघांची सब जेल रवानगी – दोन फरार !

भुसावळ – शहरातील गडकरी नगर,करूनेश्वर महादेव मंदिर जवळील संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल याने रुक्मिणी फाउंडेशन मार्फत शासनाच्या विविध विभागात शासन सेवक म्हणून नोकरीस लावून देण्याचे अमिष देवून आथिर्क फसवणूक केल्याप्रकरणी त्याचे चार साथीदारांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील तिघांची भुसावळ सब जेल रवांनगी करण्यात आली असून दोन फरार आहेत.
याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांनी ता.२८ रोजी योगेश केशव प्रसाद तिवारी यास न्यायालयात हजर केले असता संशयित आरोपीचा जामीन अर्ज फेटाळल्यानें न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली तर गुन्ह्यातील संशयित आरोपी मेघराज सिंग नारायण सिंग पाटील यास ता.२६ रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ता.२८ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.तर गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल यास ता.२९ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. तिघेही संशयित आरोपींची भुसावळ सब जेल मध्ये रवानगी करण्यात आली आहे.तसेच फरार आरोपितांचा तपास पोलीस पथक करीत आहे.त्याचप्रमाणे रेल्वे मध्ये नोकरी लावून देणारा इसम हा भुसावळ रेल्वे सल्लागार समिती वर असल्यांची कुजबुज दबक्या आवाजात सुरू आहे? तपास अधिकारी शोध घेवून पर्दाफाश करणार का? ही टोळी रुक्मिणी फाउंडेशन च्या नावाने डाटा गोळा करून नोकरी लावून देण्याचे रॅकेट चालवीत होते.
वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होणार….
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला सेवानिवृत्त लोहमार्ग पोलीस कर्मचारी वसंत ढाणे यांनी फिर्याद देतांचा मुख्य संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल यास ताब्यात घेतल्याची माहिती वाऱ्याप्रमाणे पसरली. महाराष्ट्र भरातून अनेकांनी पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांची भेट घेतली.अखेर आर्थिक फसवणूक झालेल्या महिला – पुरुषांना ज्या ठिकाणी वास्तवाला आहे त्या ठिकाणी गुन्हा नोंदवण्यास सांगितले.काही जणांनी तर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली.
आर्थिक फसवणूक प्रकरण ; पोलीस निरीक्षक तपास करणार ….
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील तीन जणांना अटक करण्यात आली असून हजर केले असता न्यायालयात कोठडी सूनवल्याने तिघांना सब जेल रवानगी करण्यात आली आहे.सदरील प्रकरणाशी सबंधितांचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस निरीक्षक राहूल वाघ यांच्याकडे तपास सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
बरेच व्यवहार रोख स्वरूपात …
शासनाच्या विविध भागात शासन सेवक लावून देण्याचे अमिष दाखवणारा मुख्य संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल याने बरेचसे व्यवहार रोख स्वरूपात केल्याची माहिती फसवणूक झालेल्यांची सांगितली.यासंदर्भात मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी त्याचे गुन्हे दाखल करण्यास सक्त मनाई केली.वरिष्ठांचे आदेश असल्याने आम्ही काहीही करू शकत नाही असे आर्थिक फसवणूक झालेल्यांना सांगण्यात येत आहे.
आर्थिक फसवणूक झालेल्यांना न्याय मिळणार का?…
शासनाच्या विविध भागात शासन सेवक लावून देण्याचे अमिषला बळी पडणारे व्यवहार भुसावळ शहरातील विठ्ठल मंदिर वार्डातील विठ्ठल रखुमाई को-ऑफ क्रेडिट सोसायटी मधील तिसऱ्या मजल्यावर रुक्मिणी फाउंडेशन त्याचप्रमाणे तोतया वृत्त वहिनीचे कार्यालयाच्या आड हा गोरख धंदा चालवीत असत या कार्यालयामध्ये शासन सेवक म्हणून नोकरी लावून देण्यासाठी अनेकांनी रोख स्वरूपात पैसे दिल्याचे आर्थिक फसवणूक झालेल्यांनी
सांगितले.अशांना न्याय मिळणार का ? असा प्रश्न फसवणूक झालेल्यांना भेळसावत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस का विशेष यातायात अभियान – जागरूकता कार्यक्रमों से बढ़ेगी सड़क सुरक्षा

0
सड़क दुर्घटनाओं में कमी लाने एवं दो पहिया वाहन चलाते समय हेलमेट धारण करने की अनिवार्यता को लेकर जिला बुरहानपुर में दिनांक 26/04/2026 से...

हद्दपार आरोपीवर पुन्हा शहरात आढळल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील नाहाटा चौकातील ब्रिजखाली हद्दपार केलेला आरोपी पुन्हा आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप बुधा खंडारे (वय २४,...

भुसावळ : नोट बदलण्याच्या कारणावरून दुकानदारावर जीवघेणा हल्ला

0
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील साक्षी ऑटो पार्ट्स या दुकानात नोट बदलण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर दुकानदारावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवार...

ज्ञापन के साथ “गौ माता को राष्ट्र माता बनाओ” के लगे नारे, शांतिपूर्ण रैली...

0
बुरहानपुर | गौ सम्मान आह्वान अभियान के तहत बुरहानपुर जिले में सैकड़ों गौभक्तों ने तहसील कार्यालय (बहादरपुर रोड) तक शांतिपूर्ण एवं अनुशासित सांकेतिक रैली निकाली।...

जायंट्स चेरिटेबल ट्रस्ट द्वारा वार्षिक साधारण सभा सम्पन्न l

0
बुरहानपुर – जायंट्स चेरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित मूकबधिर अंधविद्यालय बुरहानपुर की वार्षिक साधारण सभा विद्यालय के सभागार में सम्पन्न हुई l मीटिंग में सर्व...

error: Content is protected !!