Homeराजकीयभुसावळ नगरपरिषद निवडणूकीत पाथरवट समाजाचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे व उमेदवार...

भुसावळ नगरपरिषद निवडणूकीत पाथरवट समाजाचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे व उमेदवार अनिता सतिश सपकाळे यांना जाहीर पाठींबा

भुसावळ, दि. २९ नोव्हेंबर २०२५ (निलेश फिरके) भुसावळ नगर परिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीत पाथरवट समाजाने आपला स्पष्ट पाठींबा जाहीर केला आहे. समाजाच्या बैठकीत एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार, नगराध्यक्षपदासाठी उमेदवार रजनी संजय सावकारे यांना तर प्रभाग क्रमांक ८ मधील नगरसेवक पदासाठी उमेदवार सौ. अनिता सतीश सपकाळे यांना पाथरवट समाजाचा जाहीर आणि पूर्ण पाठींबा देण्यात आला आहे.

पाथरवट समाजाचे भुसावळ शहरातील प्रमुख पदाधिकारी तथा समाज बांधवांनी आज एका विशेष बैठकीत हा निर्णय घेतला. बैठकीत बोलताना समाजाचे अध्यक्ष तथा पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “रजनी संजय सावकारे आणि अनिता सतीश सपकाळे या दोन्ही उमेदवारांनी आतापर्यंत समाजाच्या विकासासाठी आणि हक्कांसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे यावेळी नगर परिषदेत समाजाचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी आम्ही त्यांना एकसंघ पाठींबा देत आहोत.”

प्रभाग क्रमांक ८ मध्ये पाथरवट समाजाची मोठ्या संख्येने वस्ती असल्याने हा पाठींबा उमेदवार सौ. अनिता सतीश सपकाळे यांच्या विजयात निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच नगराध्यक्षपदासाठी रजनी सावकारे यांना मिळालेला हा पाठींबा शहराच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.

पाथरवट समाजाच्या या जाहीर पाठींब्यामुळे भुसावळ नगर परिषद निवडणुकीतील चुरस आणखी वाढली असून, आगामी काळात इतर समाज आणि संघटनांकडूनही असे पाठींबे जाहीर होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

error: Content is protected !!