Homeसामाजिकसोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी कारवाईची मागणी

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी कारवाईची मागणी

भुसावळ, दि. २७ एप्रिल : सोशल मीडियावर लेवा पाटील समाजाविरोधात आक्षेपार्ह व द्वेषपूर्ण टिप्पणी केल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी भोरगाव लेवा पंचायत न्या पाडळसे, भुसावळ विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भुसावळ शहरातील रहिवासी मुकेश गंगाराम गुंजाळ यांनी सोशल मीडियावरील फेसबुकवर एका पोस्टवर केलेली टिप्पणी समाजात तेढ निर्माण करणारी आहे. संबंधित पोस्टमध्ये भुसावळच्या नगराध्यक्षांविषयी उल्लेख करत लेवा पाटील समाजाबद्दल अवमानकारक, अपमानास्पद भाषा वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, या टिप्पण्यांमुळे समाजात गैरसमज पसरून सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. “बूट चाटतो”, “लाचार समाज” अशा शब्दप्रयोगांचा वापर करून समाजाच्या सन्मानाला धक्का पोहोचविण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.
भुसावळ तालुका अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने अशा प्रकारच्या चुकीच्या व भडकावू वक्तव्यांमुळे जातीय तेढ वाढू शकते, अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, तसेच शहरात सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ : नोट बदलण्याच्या कारणावरून दुकानदारावर जीवघेणा हल्ला

0
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील साक्षी ऑटो पार्ट्स या दुकानात नोट बदलण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर दुकानदारावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवार...

ज्ञापन के साथ “गौ माता को राष्ट्र माता बनाओ” के लगे नारे, शांतिपूर्ण रैली...

0
बुरहानपुर | गौ सम्मान आह्वान अभियान के तहत बुरहानपुर जिले में सैकड़ों गौभक्तों ने तहसील कार्यालय (बहादरपुर रोड) तक शांतिपूर्ण एवं अनुशासित सांकेतिक रैली निकाली।...

जायंट्स चेरिटेबल ट्रस्ट द्वारा वार्षिक साधारण सभा सम्पन्न l

0
बुरहानपुर – जायंट्स चेरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित मूकबधिर अंधविद्यालय बुरहानपुर की वार्षिक साधारण सभा विद्यालय के सभागार में सम्पन्न हुई l मीटिंग में सर्व...

शंकराचार्य जी ने भारत को एकसूत्र मे पिरोया

0
बुरहानपूर - सुरज दहे  मध्य प्रदेश जन अभियान परिषद् विकासखंड खकनार द्वारा शासकीय सुभाष उत्कृष्ट स्कूल खकनार  मे आदि योगी शंकराचार्य जी की जयंती...

भुसावळात घरफोडी ; दागिने व रोख रक्कम लंपास

0
भुसावळ, ता.२६  शहरातील जामनेर रोडवरील यशवंत कॉलनी, नाहाटा कॉलेज समोर असलेल्या राहत्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण...

error: Content is protected !!