Homeआरोग्य'जागतिक महिला दिन' निमित्त बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क येथे 'महाआरोग्य कॅन्सर निदान...

‘जागतिक महिला दिन’ निमित्त बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क येथे ‘महाआरोग्य कॅन्सर निदान शिबिराचे’ आयोजन

महिलांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे शिबिर, त्यांच्यासाठी विविध आरोग्य तपासणी आणि मोफत सुविधा उपलब्ध करून देणारं ठरेल..

पोलीस वार्ता, बारामती : दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करून महिलांच्या हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन दिले जाते. हा दिवस त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकतो आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देतो, या दिवशी विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जगभरातील महिलांना सामाजिक, आर्थिक व राजकीय दृष्ट्या सक्षम बनवण्यावर भर दिला जातो.

यंदा 8 मार्च 2025 रोजी ‘जागतिक महिला दिन’ निमित्त बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क यांनी ‘महाआरोग्य कॅन्सर निदान शिबिर’ आयोजित केले आहे. महिलांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे शिबिर, त्यांच्यासाठी विविध आरोग्य तपासणी आणि मोफत सुविधा उपलब्ध करून देणारं ठरेल.

वेळ : शिबिर सकाळी 8:30 ते दु 4:00 वाजे दरम्यान होईल…

शिबिरात मोफत तपासणी 

  • रक्त तपासण्या (Blood Test)

1. सीबीसी टेस्ट / हिमोग्लोबिन
Bood Cell Tests(CBC & Hemoglobin)
2. रक्तातील साखर तपासणी
Blood Sugar Test (HbA1c)
3. थायरॉईड टेस्ट
TFT Test (Thyroid)
4. कॅल्शियम रक्त तपासणी
Calcium Blood Test

  • विशेष कॅन्सर तपासण्या

1. छातीचा एक्स-रे (रेडियोलॉजी)
Radiology
2. बोन मॅरो डेन्सिटी (हाडातील खनिज घनता चाचणी)
BMD
3. ईसीजी / इलेक्ट्रोकार्डियोग्राम
ECG
4. पॅप स्मीअर (गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाची तपासणी)
Pap Smear
5. एसिटिक ऍसिडसह गर्भाशय ग्रीवाची व्हिज्युअल तपासणी
VIA / Visual inspection with acetic acid
6. मॅमोग्राफी / मॅमोग्राम (स्तनाचा कर्करोगासाठी एक्स-रेस्क्रीनिंग चाचणी)
Mammography
शिबिरात आलेल्या नागरीकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व पुढील उपचाराचे सल्लेही दिले जाईल.

हे ‘शिबिर’ बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क आणि एनव्हायरोमेंट फोरम ऑफ इंडिया (NGO) यांच्या संयुक्त पुढाकाराने आयोजित केले असून यासाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तालुका आरोग्य विभाग, महिला शासकीय रुग्णालय, सिल्वर जुबली उपजिल्हा रुग्णालय, मेहता हॉस्पिटल आणि हिंद लॅब यासर्व सामाजिक सहकार्य करणाऱ्या संस्थाचा सहभाग व मोलाचा वाटा आहे.
महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आरोग्याची काळजी घेणारे हे शिबिर महिलांना नेहमीच आरोग्याविषयी जागरूक करणार असेल, आणि त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल, हाच उद्देश समोर ठेवून ‘जागतिक महिला दिनी’ या शिबिराचे आयोजन केले आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: वर्षा चव्हाण, बारामती, संपर्क: 9763852891
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!