पायल बुलबुले यांची सह व्यवस्थापकीय संचालक महावितरण यांच्या कडे मागणी
वाळूज महानगर- वाळूज जोगेश्वरी परिसरातील पोल शिफ्टींग व डबल लाईन केलेल्या कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई ची मागणी पायल जगदीश बुलबुले यांनी महावितरण चे सह व्यवस्थापकीय संचालक यांच्या कडे नियोदना द्वारे केली आहे त्यांनी नियोदनात म्हटले आहे सदरील कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी नसता उपोषणचा मार्ग अवलंबावा लागेल असा ईशारा नियोदना द्वारे देण्यात आला आहे.पायल बुलबुले यांनी माहिती अधिकार अर्ज करुन पोल शिफ्टिंग व एक पोलवर डबल लाईन केलेल्या कामांची माहिती मागितली असता सदरील माहिती देण्यात आली नाही प्रथम अपील दाखल केले असता प्रथम अपिली अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता महावितरण वाळूज यांनी साधी सुनावणी देखिल घेतली यावरुन या कामात नियम डावलून काम झाल्याचे नाकारता येत नाही त्यामुळे या कामांची चौकशी कारावी अशी मागणी केली आहे तरी चौकशी होणार का चौकशी अंती दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हे येणारी वेळच ठरवेल
चौकट
वाळूज जोगेश्वरी परिसरातील पोल शिफ्टींग व एका पोल वर डबल लाईन करण्यासाठी परवानगी देण्यात आली का शिफ्टिंग चे काम शासकिय नियमाप्रमाणे झाले का याची चौकशी करून कोणी अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.






























